जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
बदलत्या जीवनशैलीनेच आरोग्याचे प्रश्न भीषण रुपात समोर येत आहेत-डॉ. सुनिल बोराडे
जामखेड महाविद्यालयातील ‘महिला सबलीकरण कक्ष आणि IQAC’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवतींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जामखेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे यांनी ‘आहार आणि आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. नव्या युगातील धावपळीच्या जीवनशैली आणि आहार पध्दतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.
आहार संतुलित नसेल तर हृदयविकार, मधूमेह, हाडे ठिसूळ होणे, पंडूरोग अशा आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी आहारात प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे यांचे योग्य प्रमाण असले पाहिजे. ताटातील अन्न हे बहुरंगी असावे. तरच आपले आरोग्य संपन्न असेल असे मत डॉ. बोराडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डोंगरे यांनीही चंगळवाद नाकारुन नैतिक जीवनमूल्ये जपण्याची गरज व्यक्त केली. यावेळी विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. सुनिल नरके, प्रा. डॉ. सौ. देशपांडे, प्रा. सौ. साबळे, जामखेड आरोग्य विभागाची टिम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सुमारे १५० युवतींचे रक्तशर्करा, हिमोग्लोबिन, रक्तदाब अशा विविध तपासन्या करण्यात आल्या. विद्यार्थीनींनी उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. साबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रत्नमाला देशपांडे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. कु. हिना सय्यद यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. आश्विनी गायकवाड, प्रा. सौ. डोंगरे, प्रा. तनुजा पाटील, प्रा. प्रियांका बोथरा, प्रा. अपूर्वा किंबहूने, प्रा. माधुरी म्हेत्रे प्रा. नितीन तरटे, प्रा. तुकाराम घोगरदरे श्री. म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले