बकऱ्या द्या…दप्तर घ्या…विद्यार्थ्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाला बॅकफुट

0
208

 

जामखेड न्युज——

बकऱ्या द्या…दप्तर घ्या…विद्यार्थ्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाला बॅकफुट

बकऱ्या द्या…दप्तर घ्या…असे म्हणत नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी (Darevadi School) येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. जिल्हा परिषदे समोर केलेल्या या आंदोलनाला (Student Protest) यश आले आहे. दरेवाडी येथील शाळा पटसंख्येच्या आधारवर बंद केलेली शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खरंतर महिन्यापासून ही शाळा बंद करण्याचा निर्णय शालेय विभागाने घेतला होता. शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी प्रशासनाला निवेदन देऊनही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. 40 कुटुंबासाठी दरेवाडी येथे शाळा सुरू करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या नव्या धोरणामुळे पटसंख्येचा स्तर तपासून शाळा सुरू ठेवल्या जात आहे. एकूणच नाशिकमधील एक महिन्यापासून शाळा बंद होती ती शाळा विद्यार्थ्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा प्रशासनाला शाळा सुरू करावी लागली आहे.

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळा पटसंख्येच्या नव्या धोरणामुळे एक महिन्यापासून बंद होती.

शाळा सुरु करावी यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शालेय विभागाला निवेदन देऊन शाळा पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली होती.

मात्र, निवेदनाला जिल्हा परिषदेच्या शालेय विभागाने केराची टोपली दाखवली होती, महिना उलटला तरी देखील शाळा सुरू करण्याचा निर्णय होत नव्हता.

तब्बल एक महिना शाळा बंद राहिली असून विद्यार्थी महिनाभरापासून शिक्षणापासून वंचित आहे. तर दुसरीकडे शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही असे शासन सांगत आहे.

दरम्यान, बकऱ्या द्या…दप्तर घ्या…अशा आशयाखाली विद्यार्थ्यांनी नाशिकच्या जिल्हा परिषदेसमोर बकऱ्या घेऊन येत आंदोलन केले. प्रशासनाला बॅकफुट जाण्यासाठी विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन यशस्वी ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here