मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्यामुळे  वृत्तपत्र छायाचित्रकार कै. जितेंद्र अग्रवालच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी

0
164

 

जामखेड न्युज——

 मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्यामुळे  वृत्तपत्र छायाचित्रकार कै. जितेंद्र अग्रवालच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी

अडचणीत सापडलेले आपले सहकारी व त्यांचे कुटुंबीय यांना मदत करण्याची मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांची परंपरा आहे. ठिकठिकाणी आपण अशी मदत करीत असतो. अहमदनगरमध्येही एका वृत्तपत्र छायाचित्रकारच्या कुटुंबाच्या मदतीला आम्ही पत्रकार धावून गेलो.

अहमदनगर येथील वृत्तपत्र छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मुलाच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने यासाठी पाठपुरावा करण्यात आला.

त्याला प्रतिसाद देत शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या माध्यमातून फाऊंडेशनचे विश्‍वस्त तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी शैक्षणिक पालकत्व स्विकारले. भविष्यात त्याला नोकरीची संधी देखील उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय सचिव मन्सूरभाई शेख यांच्या पुढाकारातून नगरच्या पत्रकारांनी हे प्रकरण संवेदनशीलपणे घेत मदत मिळवून दिली.

काही दिवसांपुर्वी वृत्तपत्र छायाचित्रकार अग्रवाल यांचे ह्रदय विकाराचा झटका व त्यानंतर ब्रेन स्ट्रोकने निधन झाले. त्यांचा मुलगा देव अग्रवाल हुशार असून, तो अहमदनगर महाविद्यालयात बीसीए चे शिक्षण घेत आहे. आता त्याच्या भवितव्यची चिंता मिटली आहे.

मराठी पञकार परीषद हि एकमेव संघटना वा मा.श्री एस एम देशमूख सर एकमेव नेते प्रत्येक पञकारा चे हिताचे निर्णया साठी संघटन पुढे वाढवत संघटन करणारे अहमदनगर चे विभागीय सचिव मन्सूरभाई आपल या कार्याबद्दल अभिनंदन व यापुढे जोमान असे काम करण्या साठी शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here