जामखेड न्युज——विकास मंडळाच्या जागेत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार – शिक्षक नेते श्री बापूसाहेब तांबे
विकास मंडळाची अहमदनगर शहरात मध्यवर्ती भागात शिक्षकांच्या कृपेने महत्त्वाची जागा आहे. त्या ठिकाणी नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू होते, ते अर्धवट पडलेले आहे. नाट्य संकुलाची मागणी आता घटलेली आहे. त्यामुळे सदर ठिकाणी सर्व संघटना व शिक्षकांच्या संमतीने त्या आराखड्याचे रूपांतर *मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये* करण्यात येईल, अशी माहिती बापूसाहेब तांबे यांनी दिली.त्यामुळे शिक्षक, त्यांचे कुटुंबीय यांना योग्य दरात *वैद्यकीय सेवा* देण्याचे काम करता येईल, तसेच सदर हॉस्पिटल मध्ये शिक्षकांच्या पाल्यांना *नोकरीसाठी प्राधान्य* देण्यात येईल अशी माहिती प्रचार दौऱ्यात बापूसाहेब तांबे यांनी दिली.कोविड काळामध्ये मोठ्या महामारीला समाजाला तोंड द्यावे लागले अशा काळात शिक्षकांनी कोविड हॉस्पिटल सुरू करून व मदतनिधी देऊन, स्वतः ड्युटी करून सर्व समाजाला हातभार लावण्याचे कार्य केले, हे कौतुकास्पद आहे. पुढील काळामध्ये सर्व शिक्षक व कुटुंब यांची या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे मोठा आधार मिळेल अशी माहिती त्यांनी दिली.

ज्यांनी आमसभा बंद करून सर्वसामान्य सभासदांची तोंडे बंद केली,साडे तीन वर्षात झिरो पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर कमी करून सभासदांच्या तोंडाला पाणी पुसली ते सर्वसामान्यांच्या सूचना काय पाळणार आणि हा कसला जाहीरनामा? असा प्रश्न त्यांनी विरोधी मंडळाला केला. बँकेविषयी सभासदांचे हित जोपासल्यामुळे विरोधकांकडे कोणताच मुद्दा शिल्लक राहिलेला नसून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते सभासदांचा बुद्धिभेद करून प्रवास भत्ता, घड्याळ, चहापाणी, 7000 रुपये कुटुंब आधार निधीसाठी मयत निधी कापणे, सावित्री च्या लेकी या गोष्टींकडे लक्ष विचलित करून या मुद्द्यांचा विपर्यास करत आहेत.
सभासद हा सुज्ञ असून तो निश्चितच या सगळ्या बाबी जाणतो आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सभासदांचा दिवसेंदिवस गुरुमाऊली मंडळ 2015 शिक्षक, एकल मंच, ऐक्य मंडळ व शिक्षक भारती आघाडीला पाठिंबा वाढत चालला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे विवेचन त्यांनी केले. चारी मंडळ व आघाड्यांचे जाहीरनामे पाहून सभासद हित पाहणाऱ्या गुरुमाऊली मंडळ 2015, शिक्षक एकल मंच, ऐक्य मंडळ व शिक्षक भारती आघाडीला सभासदांनी भरघोस पाठिंबा द्यावा व बँकेसाठी 21 व विकास मंडळासाठी 18 फुल्या छत्री चिन्हावर मारून काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.




