जामखेड प्रतिनिधीजामखेड न्युज——योग्य आरोग्यउपचार होण्यासाठी प्रधानमंत्री हेल्थ आईडी कार्ड काढून घेण्याचे आवाहन- वैद्यकीय अधिक्षक डॉ शशांक वाघमारे

आपल्या आरोग्याबाबत तपासणी केलेली सर्व माहिती संकलित करून योग्य उपचार होण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत प्रधानमंत्री हेल्थ आयडी कार्ड काढून घेण्याचे आवाहन जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ. शशांक वाघमारे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री हेल्थ आयडी कार्ड काढून घेण्यासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय येथे डेटा इन्ट्री अधिकारी मोहित कदम, स्नेहालय जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले, क्षेत्रिय अधिकारी मझहर खान यांच्याशी संपर्क साधून १६ ते ५९ वयोगटातील रुग्णांनी स्वतःसोबत येतांना आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर (ओटीपी) सोबत घेऊन यायचे आहे. या युनिक आयडी कार्डमध्ये तुमचा आजार, लउपचार आणि वैद्यकीय चाचण्या याबाबतची सर्व माहिती नोंदवलेली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आरोग्य क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवून आणणारं पाऊल असल्याचं बोललं जातं आहे.

हे कार्ड म्हणजे एक प्रकारे तुमच्या आरोग्यासंबंधीच्या माहितीचं खातं असेल.यात आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारची माहिती नोंदवलेली असेल.यापूर्वी कोणत्या आजारावर उपचार झाले, कोणत्या रुग्णालयात झाले, कोणत्या चाचण्या करण्यात आल्या, कोणती औषधं दिली, रुग्णाला नेमके कोणते आजार आहे आणि रुग्ण एखाद्या आरोग्य योजनेशी संलग्न आहे का? इत्यादीचा त्यात समावेश असेल.

“आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे रुग्णालयांमधली प्रक्रिया सहज सोपी बनवण्याबरोबरच ईज ऑफ लिव्हिंगदेखील वाढवेल. सध्या रुग्णालयांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा, केवळ त्या रुग्णालयापुरता किंवा समुहापुरता मर्यादीत असतो.
मात्र आता हे मिशन संपूर्ण देशातील रुग्णालयांच्या डिजिटल हेल्थ सोल्युशन्सला एकमेकांशी जोडेल. त्याअंतर्गत आता देशातील नागरिकांना एक डिजिटल हेल्थ आयडी मिळेल. या हेल्थ आय डी कार्ड मुळे प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल पद्धतीनं सुरक्षित रहाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे डीजीटल हेल्थ आईडी कार्ड काढून घेण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक वाघमारे यांनी केले आहे.




