आरएसएसच्या समाजोपयोगी कामाच्या विश्वासामुळेच रामजन्मभूमीसाठी ३२०० कोटी निधी जमा

0
225

 

जामखेड न्युज——

आरएसएसच्या समाजोपयोगी कामाच्या विश्वासामुळेच रामजन्मभूमीसाठी ३२०० कोटी निधी जमा

आरएसएस चे शस्त्रपूजन व पथसंचालनय
समाजाचा विश्वास आपल्यावर वाढल्याने देशातील साडेचार लाख गावांनी रामजन्मभूमीसाठी ३२०० कोटी दिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजोपयोगी कामे केल्याने समाजाचा आपल्यावर असलेला विश्वास रामजन्मभूमी निधी संकलनावेळी पाहिला देशातील साडेसहा लाख पैकी साडेचार लाख गावांनी ३२०० कोटी निधी आपल्याला दिला आहे. जसा समाजाचा विश्वास संपादन केला तशाच विरोधी शक्ती, अराजकीय शक्ती रस्त्यावर दिसतात अगामी काळात या शक्ती जिकडीने प्रयत्न करतील यावर शासनाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्याचे काम चालू आहे.

पिएफआय ही संघटना कोणाला माहित नव्हती त्यांची व्याप्ती केरळ पर्यंत फोफावली आहे. तपासातून त्यांचे कारनामे उघड झाले आहे. त्यांना वेगवेगळ्या जातीच्या संघटनांना बळ देण्याचे प्रयत्न होऊ शकते आणि त्यांना देशाच्या विरोधात उभे करायचे यादृष्टीने काही अगाऊ नेतृत्व पुढे येऊ शकते असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम कार्यकारणी निमंत्रित सदस्य निलेश गद्रे यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त शहरातील तपनेश्वर येथील हनुमान मंदिरापासून स्वयंसेवकांचे गणवेशासहित संचलन निघाले.

सदर संचलन तपनेश्वर रोड येथून मार्केट यार्ड बीड रोड कॉर्नर कोर्ट रोड मेन रोड खर्डा चौक मार्गे महावीर भवन येथे पोहोचले. तेथे संघाचे तालुका कार्यवाह बाळासाहेब दळवी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश काशीद व प्रमुख वक्ते निलेश गद्रे पश्चिम क्षेत्र कार्यकारणी निमंत्रित सदस्य यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले.

यावेळी बहुसंख्य संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.यावेळी शहरातून संचलन जात असताना अनेक ठिकाणी नागरिकांकडून संचलनावरती पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निमंत्रित निलेश गद्रे बोलत होते.

निलेश गद्रे म्हणाले, नागरिकत्व (CAA) देण्याचा कायदा व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, दुप्पट होईल यासाठी कायदा करण्यात आला पण त्यांना विरोध होऊन उचकावण्याचा प्रयत्न झाला. अगामी काळात असे कायदे होऊ लागली तर त्या कालखंडात अधिक सजगतेने, सक्रियता दाखवून कोणत्याही चुका न करता समाजाला सोबत घेऊन पुढे जावे लागेल. अशा पध्दतीने सजगता दाखवली तर ज्या दिशेने आपण चाललो ती दिशा सफल होईल असे गद्रे म्हणाले.

पथसंचालनयामध्ये आ. राम शिंदे व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here