Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल – आमदार रोहित पवार, खर्डा लढाई...

महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल – आमदार रोहित पवार, खर्डा लढाई पुस्तकाचे प्रकाशन

0
463
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – (सुदाम वराट.)
महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केला. भाजपा फक्त राजकारण करत आहे तर महाविकास आघाडी समाजकारण करत आहे. भाजपाने जे मुद्दे सरकार विरोधात लावून धरले यात तेच तोंडघशी पडले आहेत. जनतेत महाविकास आघाडी बद्द्ल विश्वास वाढत चालला आहे तर भाजपा बद्दल चीड निर्माण होत आहे. असे मत जामखेड तालुक्यातील खर्डा येथे खर्डा लढाई ऐतिहासिक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले
 तालुक्यातील ऐतीहासीक खर्डा शहरात “खर्डा लढाई” पुस्तकाचे प्रकाशन सोहळा व हाॅटेल वैष्णवीचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, एखादा अधिकारी पदावर आसताना आरोप करत नाही पदावरून गेल्यावर दिल्लीत जाऊन काही राजकारणी लोकांना भेटतो व नंतर आरोप करतो. याची चौकशी सुरू आहे त्यामुळे लवकरच सत्य बाहेर येईल व आरोप करणारे तोंडघशी पडतील  सरकारच्या अडचणी वाढत चालल्या आहेत, असा भास विरोधकांकडून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहलेल्या पत्रात तारखांचा मेळ लागत नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार राजकीय युती असल्याचा संशय निर्माण होत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंह यांनी या साऱ्या प्रकाराविषयी वाच्यता का केली नाही? पद गेल्यानंतर त्यांनी आत्मविश्वासाने हा विषय मांडला. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यापाठी राजकीय ताकद असल्याचे काही लोकांना वाटत आहे. याप्रकरणात विरोधकही खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
भाजपच्या हातात आता फक्त राजकारणं करणं एवढंच उरलं आहे’
केंद्र सरकारकडे अनेक प्रश्न अडकले असताना त्यावर कोणी काही बोलत नाही. मात्र, असे काही विषय आल्यानंतर हे सर्व बोलायला लागतात.  त्यामुळे वाईट वाटतं. भाजपच्या हातात आता फक्त राजकारण करणं एवढंच उरलं आहे. सुशांत सिंह प्रकरणात देखील विरोधकांनी राजकारण केलं. आतादेखील दोन महिने हे प्रकरण तापवतील, नंतर सत्य बाहेर येईल. या सगळ्याच्या माध्यमातून भाजप लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
    आज आमदार रोहित पवार यांच्या हस्ते खर्डा लढाई पुस्तकाचे प्रकाशन झाले यावेळी पवार म्हणाले की डॉ.अशोक बांगर लिखित “खर्डा लढाई” या पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण सोहळा सिताराम गडावर होत आहे ही एक मोठी भाग्याची गोष्ट आहे. खर्डा लढाईला विजयी परंपरेला मोठा जाज्वल्य इतिहास हा जगापुढे मांडण्याचे काम या पुस्तकातून केले गेले आहे. या ऐतिहासिक संदर्भ पुस्तकामुळे खर्डयाचे नाव सर्वत्र मोठ्या अभिमानाने घेतले जाते. ११ मार्च१७९५ रोजी  मराठे निजाम झालेल्या लढाईमध्ये मराठ्यांचा विजय झाला हे यशोगाथा सांगणारा विजयाचा साक्षीदार असणारा मागील २२६ वर्षापासून खर्डा लढाई विजयची साक्ष देणारा किल्ला आजही ताठ मानेने उभा आहे. परंतु खर्डा व परिसरातील लढाईचे ऐतिहासिक महत्त्व जनतेपर्यंत व इतिहास प्रेमी पर्यंत पोहोचण्याचा काम या माध्यमातून होत आहे एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. लुप्त होत चाललेला खर्ड्याचा इतिहास या खर्डा लढाई पुस्तकामुळे प्रकाशित होऊन विजयची यशोगाथा सांगणारा व भविष्यात युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरलेला असे वाचनीय पुस्तक प्रकाशित होते हे आपले भाग्यच आहे. असेच इतिहासप्रेमींनी जुना ऐतिहासिक संदर्भ घेऊन व इतिहासाची सखोल माहिती घेऊन ऐतिहासिक पुरावे जनतेपुढे सादर करून आपले भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवावे असे आव्हान इतिहासप्रेमींना आ. रोहित पवार यांनी केले.
     यावेळी उपस्थित खर्डा लढाई या ग्रंथाचे लेखक प्रा. डॉ.अशोक बांगर, विजयसिंह गोलेकर व वैभव जमकावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
     या प्रकाशन सोहळ्यासाठी आ.रोहित पवार ,सिताराम गडाचे मठाधिपती महालींग महाराज नगरे, जामखेड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे, सभापती सूर्यकांत मोरे,सरपंच आसाराम गोपाळघरे, डॉ.अशोक बांगर, उषा थोरात ,माजी सरपंच शिवकुमार गुळवे, वैभव जामकावळे विजयसिंह गोलेकर, मिलन कांकरिया, तुळशीदास गोपाळघरे, रतिलाल डोके,राहुल लोळगे,सेवा संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत लोखंडे,प्रा.संजय सुरवसे  मान्यवरांच्या हस्ते “खर्डा लढाई” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी इतिहास प्रेमी सह ग्रामस्थ उपस्थित होते.
    या कार्यक्रमाचे प्रस्तावना संतोष थोरात, सूत्रसंचालन प्रा.कमल गर्जे व प्रा.शिवाजी आगे यांनी केले तर आभार तुळशीदास गोपाळघरे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!