जामखेड न्युज——
न्यू इंग्लिश स्कूल राजुरीत दांडिया नृत्य सादरीकरण
शालेय परिसर, स्वच्छता, झाडे व दांडिया नृत्य पाहून पालक भारावले
जामखेड तालुक्यातील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यु इंग्लिश स्कूल राजूरी येथील
विद्यालयात विजयादशमी निमित्त दांडिया (टिपरी ) आयोजन केले होते. दांडिया, शालेय परिसराची स्वच्छता तसेच झाडी पाहुण पालकांनी शाळेचे कौतुक केले मुलांची प्रगती पाहून आनंद व्यक्त केला.
माता पालक मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य महिला पालक उपस्थित होत्या गरबा दांडिया नृत्याचा त्यांनी आनंद घेतला स्वतः देखील या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. नृत्याचा देखील आस्वाद घेतला. त्यादेखील सहभागी झाल्या होत्या. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली मुलींचे नृत्य पाहून माता पालक खूप खुश झाल्या.
यावेळी मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे, दत्तात्रय राजमाने, सुनीता पिसाळ, गौतम हुलगुंडे, दिपक सुरवसे, दिनेश शिंदे, जाहेद बागवान, सुभाष बोराटे, बाबासाहेब समुद्र, बाबासाहेब धनवडे, सौ प्रभावती फुंदे, उमराव लटपटे, हनुमान राऊत, नवनाथ सदाफुले यांच्या सह अनेक माता पालक हजर होते. यांनी मला तर गोकुळात गेल्यासारखे वाटते अशा भावना व्यक्त केल्या.
भोंडला पंचमीची गाणी यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करावे अशादेखील सूचना केल्या. शाळेचा निसर्ग रम्य परिसर झाडी स्वच्छता शाळेमध्ये झालेला सुंदर असा बदल शाळेचे झालेले रंगकाम याबद्दल देखील खूप खूप आनंद व्यक्त केला शाळा आता खूपच छान दिसत आहे यामुळे त्या सर्वजणी भारावून गेल्या होत्या मुलींच्या कलागुणांचे त्यांनी खूप खूप कौतुक केले.