जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत गुरूमाऊली मंडळ २०१५ तांबे गटाचा विजय निश्चित- दशरथ हजारे!!!
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत गुरूमाऊली मंडळ तांबे गटाने संतोषकुमार राऊत यांच्या माध्यमातून प्रथमच नान्नज जवळा भागाला न्याय दिला आहे. त्यामुळे शिक्षक बँकेच्या निवडणुकीत गुरूमाऊली मंडळ २०१५ तांबे गटाचा विजय निश्चित त्यामुळे या भागातील सभासदांनी गुरू माऊली मंडळ २०१५ तांबे गटाच्या मागे खंबीरपणे उभे राहावे. असे आवाहन गुरूमाऊली मंडळ २०१५ तांबे गटाचे जिल्हा सरचिटणीस व ज्योतीक्रांती मल्टी स्टेट बँकेचे व्हा.चेअरमन दशरथ हजारे यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे. तसे तसे बापूसाहेब तांबे यांनी सभासदांना कसा कसा न्याय दिला ते मुद्दे समोर येत आहेत. त्यानुसार गुरूमाऊली मंडळ २०१५ तांबे गटाचे जिल्हा सरचिटणीस व ज्योतीक्रांती मल्टी स्टेट बँकेचे व्हा.चेअरमन दशरथ हजारे यांनी जामखेड तालुक्यातील नान्नज जवळा भागातील सभासदांना गुरूमाऊली तांबे गटाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करताना म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा प्राथमिक बँकेच्या स्थापनेपासून प्रत्येक निवडणुकीत नान्नज जवळा भागाला बँकेसाठी उमेदवारीची मागणी असायची. मात्र प्रत्येक वेळी ती नाकारली जायची. या भागाला उमेदवारी नाकारण्यातूनच मी, आजीनाथ हजारे, मारूती रोडे असे एकत्र ज्योतीक्रांती पतसंस्थेची स्थापना केली.

आज हि संस्था मल्टीस्टेट आहे. या संस्थेची दिल्लीतही शाखा आहे. या मधुन सांगायचे एवढेच की शिक्षक बँकेच्या राजकारणात या भागावर नेहमीच अन्याय झालाय. मात्र या निवडणूकीत प्रथमच गुरूमाऊली मंडळ २०१५ बापू तांबे यांनी या भागाला दोन उमेदवार दिलेत. यामध्ये जामखेड तालुक्यातून नान्नजचे संतोष राऊत व राहुरी तालुक्यातून जवळ्याचे पंडीत हजारे यांची पत्नी यांना उमेदवारी दिली आहे.

बँक निवडणुक प्रचारानिमित्त गुरूमाऊली मंडळाचे सरचिटणीस व ज्योतीक्रांती बँकेचे व्हा.चेअरमन दशरथ हजारे यांची सहजच भेट झाली. त्यावेळी त्यांनी या भागातील १०० टक्के मतदान बापू तांबे गुरूमाऊली मंडळ २०१५ लाच होणार असे ठामपणे सांगितले. त्यांनी केलेल्या कारभारावर सर्वसामान्य सभासद खूप खूष आहे. त्यात जवळा नान्नज भागाची नेहमीची उमेदवारीची मागणीही मान्य करून न्याय दिलेला आहे. जामखेड तालुक्यात खर्डा भागातूनही मुकुंदराज सातपुते यांना विकास मंडळाची उमेदवारी दिल्यामुळे संपूर्ण तालुक्यातच गुरूमाऊली मंडळाला खूप चांगले वातावरण आहे. जिल्हयात तर चांगले वातावरण आहेच त्यात जामखेड तालुकाही कुठेही कमी नाही. तालुक्यात प्राथ.शिक्षक संघ, गुरूमाऊली मंडळ, महिला आघाडी,उच्चाधिकार समिती जामखेड व जामखेड मधील जिल्हा,राज्य नेते सर्वांनी मिळून प्रचारात फार मोठी आघाडी घेतली आहे. यामुळे जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीत गुरूमाऊली मंडळ २०१५ तांबे गटाचा विजय निश्चित आहे.





