Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या बापू तांबे गुरूमाऊली मंडळ 2015 हेच सर्वसामान्य शिक्षकांचे मंडळ – केशव(तात्या) गायकवाड

बापू तांबे गुरूमाऊली मंडळ 2015 हेच सर्वसामान्य शिक्षकांचे मंडळ – केशव(तात्या) गायकवाड

0
244

जामखेड न्युज——

बापू तांबे गुरूमाऊली मंडळ 2015 हेच सर्वसामान्य शिक्षकांचे मंडळ – केशव(तात्या) गायकवाड

विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर गुरूमाऊली मंडळाचे नेते श्रीहरी साबळे यांच्या मुलाच्या मेडिकल स्टोअर्सच्या शुभारंभ प्रसंगी भेटीच्या वेळी जिल्हा नेते केशव (तात्या)गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केले. प्रसंगी उपस्थित राज्य नेते किसन वराट, विश्वस्त गोकुळ गायकवाड, जिल्हा नेते महेश धामणे, शहाजी जगताप, श्रीहरी साबळे, विकास बगाडे, जालिंदर भोगल, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष एकनाथ(दादा)चव्हाण, शिक्षक बँकेचे उमेदवार संतोषकुमार राऊत, विकास मंडळाचे उमेदवार मुकुंदराज सातपुते, मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख धिरज उदमले, सरचिटणीस रूपेश वाणी, पाचारणे सर, बर्डे सर, खंडू सोळंकी, सहकारी मित्र शिक्षक भारतीचे बाबा चव्हाण, बबन बारगजे, लहु गीते उपस्थित होते.

 

या कार्यक्रमानंतर शिक्षक बँकेचे सामान्य सभासद लहु गीते यांनी खूप छान आपले मत मांडले.
✅ शिक्षक बँकेने कर्ज मर्यादा ९ लाखावरून ३५ लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढवली..

✅ संचालकाला कर्जासाठी फोन न करता.. अखंडपणे कर्ज सुरू ठेवले…

✅ कर्जाचा व्याजदर 11 टक्के वरून 8.70 % वर आणला..

✅ शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज,वाहन कर्ज इत्यादी कर्ज सुरू केले..

✅ कोवीड महामारीच्या काळात कोवीड कर्ज सुरू केले ..

✅ सर्व कर्जांना मयत निधीचे संरक्षण दिले…

✅ लाभांश १ टक्क्यांवरून १०.१० टक्केपर्यंत दिला….

✅ कायम ठेवीवरील व्याज ४ टक्क्यावरून ८.२५ टक्क्यांपर्यंत दिले….

✅ मुदत ठेवीवरील व्याजदर व कर्जावरील व्याजदर यातील तफावत तीन टक्के पेक्षा जास्त असू नये …असा पोटनियम दुरुस्त केला..

✅ स्टाफिंग पॅटर्न लागू करून कर्मचारी भरती केली नाही.

  यावेळी जामखेड न्युजशी बोलताना केशव गायकवाड म्हणाले की, आत्तापर्यंत गुरुमाऊली मंडळ 2015 ने ( तांबे गट ) जो वचननामा दिला तो त्यांनी पूर्ण करून दाखवलेला आहे परंतु जे आता वचनदेत आहोत तेही पूर्ण करणारच. (कर्ज व्याजदर 7% करणार)कारभार 2% टक्के फरकाने करणार नाही तर तो आम्ही 1.70%फरकाने केला आहे. प्रत्येकाला स्वतःचे हित कळते. त्यामुळेवचननाम्याची खात्री आसल्याने निवडून छत्रीच येणार आहे. असेही गायकवाड यांनी सांगितले. 

अभिमान वाटतो मला या गुरुमाऊली मंडळाचा… अभिमान वाटतो मला या संचालकाच्या आदर्शवत कारभाराचा ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!