Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या आम्ही गद्दार नव्हे… बाळासाहेबांचे शिलेदार… तुम्ही बापाला विकण्याचा प्रयत्न केला.- मुख्यमंत्री एकनाथ...

आम्ही गद्दार नव्हे… बाळासाहेबांचे शिलेदार… तुम्ही बापाला विकण्याचा प्रयत्न केला.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
248

जामखेड न्युज——

आम्ही गद्दार नव्हे… बाळासाहेबांचे शिलेदार… तुम्ही बापाला विकण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचे विचार… आम्ही बाळासाहेबांचे वारसदार आहोत. आम्ही गद्दार नाही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. तुम्ही बापाला विकण्याचा प्रयत्न केला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

शिंदे गटाने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गद्दारी नाही तर आम्ही गदर आहोत. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य व सत्व महत्वाचे आहे. आम्ही केले ते राज्याच्या हितासाठी केले. शिवसेनेचा रिमोट राष्ट्रवादीच्या हातात आहे. आमची भूमिका जनतेला देखील मान्य आहे, असे ते म्हणाले.

शिंदे म्हणाले की, खरे गद्दार तुम्ही आहात. शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला. गद्दारांना साथ द्यायची नाही, हे जनतेने ठरवले आहे. बाळासाहेबांच्या समाधीवर गुडघे टेका व माफी मागा, असंे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली, विचारांना तिलांजली दिली. मग तुम्हाला त्या जागेवर उभा राहण्याचा आणि बोलण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का? हजारो शिवसैनिकांनी आपला घाम, रक्त, सांडून जो पक्ष उभा केला तो तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी, महत्त्वकांक्षेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण टाकला, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी तोफ डागली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!