जामखेड न्युज——
आ.य.पवारांच्या कविता महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठात समावेश झाल्याने जामखेड सह नगर जिल्ह्याच्या लौकिकात भर – छत्रपती संभाजीराजे!!!
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा.खासदार छत्रपती संभाजी राजे दि.३ आक्टोंबर रोजी खर्डा येथील आमदार रोहित पवारांनी आयोजित केलेल्या रावण दहनाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणेस जात असताना, राज्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अवधूत पवार यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी समिक्षा ग्रंथ भेट दिला यावेळी बोलताना ते म्हणाले आ.य.पवारांच्या कविता महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठात समावेश झाल्याने जामखेड सह नगर जिल्ह्याच्या लौकिकात भर – छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

त्यांच्या समवेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड होते. यावेळी ढोल ताशाचे गजरात अवधूत पवारसह जामखेड शहरातील विविध कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.युवक कॉंग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष राहुल उगले, तालुकाध्यक्ष शिवराज घुमरे, राष्ट्रवादीचे युवा नेते गणेश वारे,हाजी जावेद सय्यद, प्रसिद्ध लेखक प्रा.आ.य.पवार, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,प्रा. विजया नलवडे, देवीदास भादलकर, राम निकम, बावीचे चेअरमन सुंदरदास बिरंगळ, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भरत देवकर, प्रकाश मुरुमकर, संभाजी ढोले आदींसह मान्यवर उपस्थित होते.

प्रा विजया नलवडे यांनी संभाजी राजे यांच्या जीवनकार्याचा काव्यातून परिचय मांडला. उपस्थितांनी त्यास दाद दिली.यावेळी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी कवि आ.य.पवारांच्या निसर्ग विज्ञान कवितेवर लातूर येथील राष्ट्रीय चर्चासत्राने प्रसिद्ध
केलेला समीक्षा ग्रंथ छत्रपती संभाजी राजे यांना भेट दिला.

” पवारांची कविता मुंबई, नागपूर,
नांदेड, अमरावती व कर्नाटक विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. तसेच पवारांच्या कवितेवर प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समीक्षा ग्रंथाने जामखेडसह नगर जिल्ह्याचे लौकिकात मोठी भर पडली आहे ” असे गौरवोद्गार छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले. संभाजी ढोले यांनी सर्वांचे आभार मानले.






