छत्रपती संभाजीराजे सह नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत खर्ड्याच्या शिवपट्टन किल्यासमोर होणार सर्वात मोठा रावण दहणाचा कार्यक्रम -आमदार रोहित पवार

0
230
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज——
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यासमोरील स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने राज्यातील सर्वात मोठा रावण दहनाचा कार्यक्रम दि 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी होणार आहे. 
या कार्यक्रमास युवराज छत्रपती संभाजीराजे, टीव्ही सिरीयल मध्ये नावाजलेले रामायण मालिकेतील राम, (अरुण गोविल) सीता, (दीपिका चिखलिया) लक्ष्मण, (सुनील लहरी) तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती आमदार रोहित दादा पवार यांनी दिली आहे.
या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी रावण रुपी दृष्ट प्रवृत्तींना नष्ट करून रामराज्य आणण्याचा संकल्प करण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जनता यावेळी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण युवराज छत्रपती संभाजी महाराज आहेत, तसेच भारतातील टीव्ही मालिकेतील नावाजलेले कलाकार अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लहरी व आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू केदार जाधव हे उपस्थित राहणार असून एक वर्षांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी भारतातील सर्वात मोठा स्वराज्य ध्वजाचा भव्य कार्यक्रमानंतर हा रावण दहनाचा कार्यक्रम खर्डेकरांसाठी मोठी पर्वणीच ठरणार असल्याचे पहावयास मिळणार आहे.
खर्डा (शिवपट्टण) किल्ल्याच्या स्वराज्य ध्वजाच्या समोरील पटांगणात सर्वात मोठा रावण दहनाच्या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित (दादा) पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here