जामखेड न्युज——
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सहा गावात महिला विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
नायगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या संध्या सोनवणे यांचा पुढाकार
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नायगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या संध्या सोनवणे यांच्या पुढाकारातून तालुक्यातील नायगाव,राजुरी,खर्डा,खूरदैठण,शिरूर,तेलंगशी या गावात विद्यार्थिनीं व महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या आरोग्य तपासणीला शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त मिळत आहे.
कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,त्याअनुषंगाने नायगाव ग्रामपंचायतीच्या तरुण सदस्या संध्याताई सोनवणे यांच्या पुढाकारातून महिला व विद्यार्थिसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे करण्यात आले,त्यानुसार आज दि 29 रोजी नायगाव येथे आरोग्य तपासणी शिबिराचे नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,सरपंच सुवर्णा उगले,भजनाळे,मुख्याध्यापक साळवी सर,ग्रामसेवक स्वाती पटेकर,युवराज उगले,चंद्रकांत उगले,विनोद उगले,नितीन ससाणे,सचिन उगले,गजानन उगले,महेश सोनवणे,शंकर खैरे उपस्थित होते.
यावेळी दि 30 रोजी खर्डा दि 01 रोजी राजुरी दि 3 रोजी खुरदैठण दि 4 रोजी तेलंगशी दि 5 रोजी शिरूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय मुलींमध्ये रक्ताचे प्रमाण कमी आढल्याने मुलींनी भविष्यात अनेक शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते.आजाराचे प्रमाण वाढते.यासाठी विशेषतः नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ह्या तपासण्या केल्या यावरून मुलींना-महिलांना आरोग्यविषयक योग्य ते मार्गदर्शन देखील डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे तरी शिबिराचा महिला व विद्यार्थिनीं लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे
स्त्रियांचे आरोग्य हा महिला सक्षमीकरणाचा एक महत्वाचा पैलू आहे. विद्यार्थिनी तसेच महिलांमध्ये स्त्रीआरोग्य हा महत्वाचा विषय आहे; हे अधोरेखित करण्यासाठी व आ रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अशा प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन उपयुक्त असल्याचे प्रतिपादन आयोजक संध्याताई सोनवणे यांनी व्यक्त केले.