आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाराष्ट्राचा महावक्ता वकृत्व स्पर्धेत कोल्हापूरच्या पाटील प्रथम क्रमांक बारामतीकरांचा दुसरा तर जामखेडच्या शिवगंगा मत्रेचा तृतीय क्रमांक

0
172

 

               जामखेड न्युज——

आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाराष्ट्राचा महावक्ता वकृत्व स्पर्धेत कोल्हापूरच्या पाटील प्रथम क्रमांक

बारामती येथील दत्तात्रय चोरमले व अशोकनगर येथील योगिता कसबे या दोंघानामध्ये व्दितीय

तर जामखेडच्या शिवगंगा मत्रेचा तृतीय क्रमांक

कर्जत-जामखेड मतदारसघांचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना प्रमुख सावता हजारे व प्रदीप हजारे यांनी आयोजित केलेल्या कोण होणार महाराष्ट्राचा ‘महावक्ता’ या वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूरच्या प्रणाली पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राचा ‘महावक्ता’ होण्याचा बहुमान मिळवला. कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत,सभापती सुर्यकांत मोरे, सरपंच प्रशांत शिंदे, सावता हजारे यांच्या हस्ते २१ हजार रोख, फिरता करंडक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

ही स्पर्धा तालुक्यातील जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेण्यात आली. यावेळी कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, सभापती सुर्यकांत मोरे, सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, सावता ग्रुप अध्यक्ष प्रमोद कोल्हे, सुभाष रोडे, राहुल हजारे, राहुल पाटील, ईश्वर हजारे, पांडुरंग शेळके,अमोल हजारे, जीवन रोडे, नवनाथ राऊत, तुषार कोल्हे, राम हजारे, अविनाश पठाडे, तुषार काढणे, भाऊसाहेब कसरे उपस्थित होते.

कोण होणार महाराष्ट्राचा ‘महावक्ता’ या स्पर्धेत महाराष्ट्रच्या सतरा जिल्ह्यातून ५३ स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. तालुक्यातील जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत बारामती येथील दत्तात्रय चोरमले व अशोकनगर येथील योगिता कसबे या दोंघानामध्ये व्दितीय क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे पारितोषिक विभागून देण्यात आले.तर तृतीय क्रमाकांचे पारितोषिक कोल्हापूरच्या संकेत पाटील व जामखेड येथील शिवगंगा म्हेत्रे यांच्यामध्ये ११ हजार रुपयांचे पारितोषिक विभागून देण्यात आले. तसेच चौथ्या क्रमांकाचे ५ हजार रुपयांचे पारितोषिक पारनेर येथील अशोक शिंदे व जवळा येथील मिताली पोपळे यांच्या मध्ये विभागून देण्यात आले.

विशेष उत्तेजनार्थ मध्ये ईश्वरी पाटील, आदित्य हजारे, रोहन चव्हाण, स्वप्निल कोल्हे, विद्या घायतडक, वैष्णवी पागिरे, रोहन नलगे, अनिकेत दमले, तेजस पाटील, संस्कृती मते या दहा जणांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पठाडे यांनी केले. तर सूत्रसंचालन अशोक हजारे यांनी केले. स्पर्धेसाठी प्रा.शिवराज आनंदकर, शिक्षक सुदाम शिंदे व निखिल नगरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

संत सावता माळी मंदिरासाठी १० लाखांचा निधी
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी जवळा येथील श्री संत सावता माळी मंदिरासाठी आमदार निधीतून १० लाख रुपय दिल्यांची घोषण केली.यावेळी युवा सेना प्रमुख सावता हजारे यांनी रोहित पवार यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here