जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——जामखेडला रेल्वे कधी येणार!!!
आम आदमी पार्टीचे उपमुख्यमंत्री यांना निवेदन
जामखेड तालुक्यात बहुचर्चित असलेला विषय म्हणजे जामखेडला रेल्वे आली पाहिजे. या चर्चेस कृतीत उतरवण्यासाठी जामखेड येथील आम आदमी पार्टीच्या वतीने काल दि. २३ सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जामखेडला रेल्वे आणावी यासाठी आष्टी येथे जाऊन निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहर हे एक महत्त्वाचे तालुका मुख्यालय आहे. अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक अतिशय प्रसिद्ध व्यवसाय केंद्र आहे.
जामखेड शहर हे अहमदनगर – परळी वैजनाथ रेल्वे मार्गावरील नवीन स्टेशन झालेल्या न्यू आष्टी या रेल्वे स्थानकापासून केवळ १८ किमी अंतरावर आहे.
विशेष बाब म्हणून म्हणून १८ किमी लांबीची नवीन रेल्वे मार्ग निर्माण करून सध्याचे आष्टी रेल्वे स्थानक व प्रस्तावित जामखेड रेल्वे स्थानक यांना जोडावा.
“घाटनांदूर आणि दौंड मार्गे अंबाजोगाई, कैज, मांजर-सुंबा, पाटोदा आणि जामखेड” दरम्यानची नवीन प्रस्तावित रेल्वे लाईन हा अत्यंत मागासलेल्या बीड आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प आहे.
या नवीन रेल्वे प्रकल्पामुळे या सर्वात मागासलेल्या जामखेड सारखो भागाच्या आर्थिक, व्यावसायिक, औद्योगिक आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल आणि रेल्वे विभागाला निश्चितपणे आणखी खूप मोठा महसूल मिळेल.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेबजी दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर-आष्टी रेल्वे मार्गाचा लोकार्पण सोहळ्याचे निमित्ताने दि. २३ सप्टेंबर रोजी आष्टी आले होते. यावेळी त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष नवलाखा, तालुका अध्यक्ष बजरंग सरडे, अजय भोसले आदि उपस्थित.