महाराष्ट्र राज्य सायकलींग चॅम्पियनशिपमध्ये पांडुरंग सानप यांना द्वितीय पारितोषिक

0
159

जामखेड न्युज——

महाराष्ट्र राज्य सायकलींग चॅम्पियनशिपमध्ये पांडुरंग सानप यांना द्वितीय पारितोषिक

 

औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय सायकल स्पर्धेमध्ये जामखेड येथील सायकलपटू पांडुरंग सानप यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दि. १८ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य सायकलिंग स्पर्धेत जामखेड येथील पांडुरंग सानप यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले आहे एकूण 70 ते 75 सायकलिस्ट होते त्यामध्ये 20 किलोमीटरचे अंतर ठेवले होते आणि प्रत्येक एज ग्रुप नुसार ती स्पर्धा चालू केली होती. यात सानप यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे.

प्रचंड जिद्द व प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नाही हे करून दाखवले आहे डॉ. सानप यांनी पणजी येथे २० ऑक्टोबर रोजी झालेली खडतर अशी आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन ७०.३० ही स्पर्धाही डॉक्टर पांडुरंग सानप यांनी वेळे आधीच पूर्ण केली होती.

त्यांची वाटचाल ही तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे गोवा राज्यातील पणजी या ठिकाणी मिरामार समुद्रकिनारी ही आयर्न मॅन स्पर्धा आयोजित केली होती. २७ देशातील स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता तर महाराष्ट्रातील ६० जण या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये १.९ किलोमीटर जलतरण, ९० किलोमीटर सायकल चालवणे व २१ किलो मीटर धावणे हे सर्व लक्ष न थांबता ८ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करणे आवश्यक होते. हे लक्ष डॉक्टर पांडुरंग सानप यांनी न थांबता ७ तास २९ मिनिटांमध्ये निश्चित वेळेआधी एक तास लवकर पूर्ण केले होते.

श्रीनगर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवासही पांडुरंग सानप यांनी केलेला आहे. 

सौताडा येथील रहिवासी असलेले डॉक्टर पांडुरंग सानप वैद्यकीय व्यवसायानिमित्त जामखेड येथे स्थायिक झालेले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी केवळ व्यायामाच्या उद्देशातून सुरू केलेला धावण्याचा सराव हळूहळू वाढत जाऊन त्यांनी १० किलोमीटर धावण्याचा सराव पूर्ण केला काही महिन्यापूर्वी ट्रायथलॉन १.५ किलोमीटर जलतरण ४० किलोमीटर सायकलिंग व १० किलो मीटर धावणे या स्पर्धेत अव्वल स्थान डॉक्टर सानप यांनी मिळवले होते.

 

डॉक्टर सानप यांनी आत्तापर्यंत धाराशिव, सातारा, नगर, पुणे, मुंबई येथील हाफ मॅरेथॉन २१ किलो मीटर फुल मॅरेथॉन ४२ किलो मीटर अल्ट्रा मॅरेथॉन ५० किलोमीटर व ६० किलोमीटर स्पर्धा अशा अनेक स्पर्धा पूर्ण केल्या आहेत

डाॅ. सानप यांनी शारीरिक तंदुरुस्ती व व्यायामाच्या आवडीतून दररोज सकाळी सायकल चालवत काही किलोमीटर अंतरावर जाऊन व्यायाम व योगासने करतात. सुरुवातीला एकट्याने सुरू केलेल्या या उपक्रमात आज व्यायामाचे महत्त्व पटल्याने दहा जणांचा ग्रुप झाला आहे. नित्यनेमाने हे सकाळी वीस किलोमीटर सायकलिंग व काही अंतर धावणे नंतर योगासन असा त्यांचा रोजचा कार्यक्रम असतो. आतापर्यंत त्यांनी विविध पारितोषिके पटकावली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here