मुंबई येथील राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत अद्वैत थोरातला गोल्डमेडल खर्डा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
166

जामखेड न्युज——

मुंबई येथील राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत अद्वैत थोरातला गोल्डमेडल

खर्डा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

खर्डा येथील अमोल थोरात यांचे चिरंजीव अद्वैत
थोरात याने बोईसर (मुंबई) येथे झालेल्या ऑल
महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल जिंकले आहे.
या कामगिरीने अद्वैत थोरात याने खर्डा शहराचे नाव
महाराष्ट्रात गाजवीले आहे. त्यामुळे त्याच्यावर
अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यापूर्वी त्याने 2019साली अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे कप स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते.

तर गुजरात स्टेट कराटे स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते, तसेच स्केटिंग स्पर्धेत नॉनस्टॉप दोन तास न थांबता या स्पर्धेत सुद्धा त्याने गोल्ड मेडल मिळविले होते. 

एवढ्या कमीवयात त्याने असे नाव कमावल्याने भविष्यात त्याला भारत देशासाठी मोठा खेळाडू बनवण्याची इच्छा आहे असे त्याचे वडील अमोल थोरात यांनी व्यक्त केली आहे.

खर्डा येथील शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर
थोरात यांचा अद्वैत नातू असून खर्डा येथील पत्रकार संतोष थोरात यांचा तो पुतण्या आहे,त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here