जामखेड न्युज——
माजी सरपंच कैलास माने सरांची शिवसेना (शिंदे गट)जामखेड तालुकाप्रमुख म्हणून निवड
जामखेडचे माजी सरपंच कैलास माने सर यांची जामखेड तालुका शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख
म्हणून आज निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहीचे पत्र जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष लोंढे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यांना देण्यात आले आहे.

माने सरांची शिवसेना तालुकाप्रमुख निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे.

जामखेडचे माजी सरपंच प्रा कैलास माने यांनी आपल्या समर्थकांसह आज अहमदनगर येथे शिंदे गटात प्रवेश केला आहे. माने यांनी शिंदे गटात प्रवेश करताच माने यांच्या खांद्यावर पक्षाने जामखेड तालुका प्रमुख पदाची धुरा सोपवली आहे. जामखेड तालुक्यात शिवसेना शिंदे गटात कोण जाणार याची सर्वांनाच उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर शिंदे गटाच्या गळाला जामखेड तालुक्यातून मोठा मासा आज लागला.

जामखेडचे माजी सरपंच प्रा कैलास माने यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष लोंढे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, पाथर्डी तालुका प्रमुख विष्णुपंत ढाकणे, शेवगाव तालुका प्रमुख अशुतोष डहाळे, जामखेड तालुका उपप्रमुख संतोष वाळूंजकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अहमदनगर येथे पार पडला.

यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या जामखेड तालुका प्रमुखपदी प्रा कैलास माने यांना निवडीचे पत्र जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष लोंढे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे. यावेळी कपिल माने,अभिजीत माने,सोहेल तांबोळी, बबलू जाधव, गणेश जाधव, अनिकेत जाधव, ऋषीकेश जाधव, अरबाज शेख, अजहर शेख, अक्षय गुरसाळे, राहूल माने, अक्षय शिंदे, विशाल काशिद, आनंद भोज, यश जाधव, अवधूत वासकर, रोहित राऊत सह आदी उपस्थित होते.
पत्रात म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य
नेते माननिय श्री. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार आपली, शिवसेना पक्षाच्या तालुकाप्रमुख पदी ( कार्यक्षेत्र – जामखेड तालुका ) नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल.वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे.









