सीना धरणातील ओव्हरफ्लो पाणी शेतकर्यांना गरजेनुसा देण्याच्या जलसंपदा अधिकाऱ्यांना आमदार रोहित पवारांच्या सूचना

0
176

 

जामखेड न्युज——

आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नातून सीना कालव्यातून धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सोडण्यात येतंय आवर्तन

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ आ.रोहित पवार यांनी केल्या सूचना

सीना धरण गेल्या दीड महिन्यापासून कुकडीच्या पाण्याने आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून भरून घेतले जात होते. सिना धरण नुकतेच ओव्हर फ्लो झाले आहे, त्यानंतर तात्काळ आमदार रोहित दादा पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना सीना उजव्या कालव्यातून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आवर्तन सोडण्यात यावे, अशा सूचना केल्या. मतदारसंघात यंदा बऱ्यापैकी पाऊस झाला पण तरी देखील अनेक तलाव, ओढे हे भर पावसात कोरडेठाक असल्याचे पाहायला मिळाले आणि हे भरून घेणे गरजेचे असल्याचे आ. रोहित पवार यांनी ओळखून सिना कालव्यातून आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या.

आमदार रोहित दादा पवार यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता काळे साहेब यांच्याशी चर्चा करून सध्याची असलेली गरज व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता आवर्तन सोडण्याबाबत सूचना केल्यानंतर आता सीना उजव्या कालव्यातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व सोयीसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. या आवर्तनाचा फायदा हा आसपासच्या 21 गावांना होणार असून शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी अगदी गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

कायमच आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे आमदार रोहित दादा पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अशातच शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांनी केलेले हे प्रयत्न नक्कीच शेतकऱ्याच्या फायद्याचे आहेत अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here