आमदार प्रा. राम शिंदे व नगरसेवक अमित चिंतामणी गणेश विसर्जन मिरवणुकीत थिरकले गाण्यावर!!

0
210

जामखेड प्रतिनिधी
                जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे व नगरसेवक अमित चिंतामणी गणेश विसर्जन मिरवणुकीत थिरकले गाण्यावर!!

आमदार प्रा. राम शिंदे व नगरसेवक अमित चिंतामणी गणेश विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांबरोबर गाण्यांवर थिरकले यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला आमदार साहेबांच्या नृत्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या माध्यमातून ते नाविन्यपूर्ण पध्दतीने जामखेड शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. त्यांनी आयोजित केलेले सर्व सांस्कृतिक कार्यक्रम कौतुकास्पद आसतात. यावेळीही त्यांनी गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान मंडळातील अध्यक्षांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहीत केले. असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रा. राम शिंदे यांनी केले.

सालाबाद प्रमाणे जामखेड शहरातील मेन रोड भागातील मुख्य मिरवणूक मार्गाने जाणार्‍या शहरातील सर्व गणेश मंडळांचे स्वागत आ. प्रा राम शिंदे व माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील विसर्जन मिरवणूकी दरम्यान गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी जामखेडचे नगरसेवक हे सालाबाद प्रमाणे स्वागत कक्ष उभारतात. या वर्षी देखील स्वागत कक्ष उभारला होता. यावेळी आ. प्रा. राम शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली होती.

नगरसेवक अमित चिंतामणी व आ.प्रा. राम शिंदे यांनी शनीचौक या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात स्वागत करण्यासाठी थांबले होते. शहरातील गणेश मंडळांनी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक काढली होती. त्यामुळे गणेश मुर्ती विसर्जन मिरवणूकी दरम्यान विसर्जन करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या शहरातील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आनेक मान्यवर उपस्थित होते.

आ. प्रा राम शिंदे हे स्वतःहा मिरवणूकीत सहभागी होऊन गाण्यांवर थिरकले. त्यामुळे गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. अखेर शेवटी शहरातील सर्व गणेश मंडळातर्फे काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणूका शांततेत पार पडल्या. जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here