चिंचपूर ते जामखेड राष्ट्रीय महामार्ग रस्ता बनला मृत्यूचा सापळा!!! मोठमोठ्या खड्यामुळे रोजच होतात अपघात

0
216

जामखेड प्रतिनिधी
               जामखेड न्युज—-
चिंचपूर ते जामखेड राष्ट्रीय महामार्ग रस्ता बनला मृत्यूचा सापळा!!!
मोठमोठ्या खड्यामुळे रोजच होतात अपघात

“वाहनचालकांना करावी लागते तारेवरची कसरत”
“खड्यात रस्ता कि, रस्त्यावर खड्डा कळतच नाही”
“दररोजच होतात अनेक अपघात”
“रस्ता मंजूर, टेंडर झाले मोजणी झाली पण काम सुरू नाही “
“राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन दिवसांपूर्वी लाल माती टाकून खड्डे बुजविले एकाच पावसात माती गायब”

जामखेड साठी आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे आहेत. तरीही चिंचपूर ते जामखेड रस्ता म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे आहेत. या रस्त्यावरून प्रवास म्हणजे खूपच कठीण काम आहे. गाड्याचे स्पेअरपार्ट व मानसांचे मणके खिळखिळे होत आहेत. दोन आमदार असुनही रस्ता का होत नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

नगर बीड रस्ता काम मंजूर आहे बजेट पडले आहे टेंडर झाले आहे. काम कधी सुरू होणार सध्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे आहेत. यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तसेच जामखेड कर्जत रस्ता काम सुरू आहे थोडा पाऊस झाला की कितीतरी गाड्या घसरून अपघात होतात. अनेकांना आपले हातपाय गमवावे लागले आहेत. यामुळे लवकरात लवकर रस्ता करावा अशी मागणी जामखेड न्युजशी बोलताना लोक करत आहेत.

बाहेर गावचे पाहुणे जामखेडला आले की म्हणतात जामखेडचे रस्ते खूपच खराब आहेत त्यामुळे परत जामखेडला नको म्हणून सांगतात.

नगर- जामखेड रस्ता चिंचपूर ते जामखेड पर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. चिंचपूर हद्दीत तर खुप मोठ मोठे खड्डे आहेत अनेक अपघात रोजच होतात. विंचरणा नदी आसपास रस्त्यावर मोठ मोठे खड्डे आहेत. यातच रस्त्यावर कडेच्या दुकानदार व रहिवासी यांचे बाथरूम व ड्रेनेज चे पाणी रस्त्यावर असते त्यामुळे वाहनचालकांना वाहने मोठी कसरत करावी लागत आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून अनेक वेळा फक्त सांगण्यात येत आहे की. रस्ता मंजूर आहे टेंडर झाले आहे लवकरच काम सुरू होईल पण अद्याप काम सुरू होत नाही त्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

नगर जामखेड बीड या राष्ट्रीय महामार्गावर आसलेल्या जामखेड ते चिंचपूर या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या महामार्गावरील रस्ता उखडून मोठ मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची चाळणी झाली आहे. परीणामी वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. हा महामार्ग म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात

जामखेड ते बीड जिल्ह्य़ातील चिंचपूर या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याच बरोबर जामखेड शहरातून जाणाऱ्या या जामखेड बस स्थानक ते खर्डा चौक या ठिकाणी देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरही सदर रस्त्याच्या दुरूस्तीकडेही सबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
बांधकाम विभाग म्हणते तो नॅशनल हायवे आहे. त्यामुळे दुरूस्ती होत नाही.

जामखेड तै सौताडा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामास मंजुरी मिळाली आहे. मात्र अद्याप या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे देखील शहरातील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॉफीक जाम होते त्यामुळे तातडीने हे काम देखील सुरू करण्याची मागणी जामखेड करांकडुन होत आहे. मंजूर झालेल्या जामखेड ते सौताडा या १८० कोटींच्या या रस्त्याचे रुंदीकरण झाले तर वाहतुक अडथळा दुर होऊन ट्रॉफीक पोलीसांचे देखील काम हालके होण्यास मदत मिळणार आहे. तसेच जामखेड शहराच्या वैभवात देखील भर पडणार आहे.

जामखेड ते सौताडा महामार्ग मंजूर आहे आमदार रोहित पवार व खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांनी सांगितले की आमच्या प्रयत्नातून हा महामार्ग मंजूर आहे. दोघांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बरोबरचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते व पत्रकार परिषदेत आम्हीच रस्ता मंजूर केला असे सांगितले होते. लवकरात लवकर रस्ता दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here