जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथील चौतीस वर्षीय युवक बेपत्ता
जांबवाडी येथील संतोष नामदेव सागडे आसे या युवकाचे नाव आहे तो गुरुवार दि. 8/9/2022 पासुन बेपत्ता झालेला आहे गुरुवारी सकाळी जांबवाडी येथील किरणा दुकानासमोर बसलेला असताना एक अज्ञात युवक मोटारसायकल घेऊन आला व त्याच्या गाडीवर बसुन संतोष बेपत्ता झालेला आहे .
अंगावर भगव्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची नाईट पाॅन्ट घातलेली आहे त्याच्याजवळील मोबाईल फोन व इतर वस्तू ही घरीच आहेत संतोषच्या घरच्या मंडळीनी सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला आहे परंतु तो सापडत नसल्याने त्याचे बंधु नवनाथ सागडे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला मिसींगची तक्रार दाखल केली आहे व पुढील शोध पोलीस घेत आहेत.
संतोषच्या आचानक बेपत्ता होण्याने कंटुंबात घबराटीचे वातावरण आहे
जामखेड पोलीसांनी लवकरात लवकर शोध घ्यावा अशी विनंती संतोषचे कुटुंब करत आहे