जामखेड नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण संरक्षणासाठी घरोघरी जाऊन गणेशमूर्तीचे संकलन मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांचा स्तुत्य उपक्रम

0
178

जामखेड प्रतिनिधी
                   जामखेड न्युज——

जामखेड नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण संरक्षणासाठी घरोघरी जाऊन गणेशमूर्तीचे संकलन

मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांचा स्तुत्य उपक्रम

जामखेड शहराच्या पर्यावरण संरक्षणासाठी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी यावर्षी स्वतः पुढाकार घेत एक लाभकारक निर्णय घेतला तो म्हणजे जामखेड शहरातील घरगुती गणेश विसर्जनासाठी नगरपरिषदेमार्फत घरोघरी जाऊन गणेशमुर्त्यांचे संकलन करून त्यांचे कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या तलावामध्ये विसर्जन करण्यात आले, शहरातील नागरिकांनीही या उपक्रमास चां प्रतिसाद दिला.

जामखेड शहरात यंदा सार्वजनिक गणेशोत्सव 2022 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना महामारी नंतर जामखेड शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यंदा गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांकडून विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. शांततामय वातावरणात यंदाचा गणेशोत्सव साजरा झाला. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी नगरपरिषदेने चोख व्यवस्था केली होती. गणरायाच्या आगमनापासून सात दिवसानंतर ते दहाव्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या दिवशी शहरात गणेशविसर्जन सुरू झाले होते. सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती तसेच घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडत आहे. ९ सप्टेंबर रोजी नगरपरिषदेचचे कर्मचारी घरोघर जाऊन घरगुती गणेश मूर्ती संकलित करताना दिसले. यासाठी सजवलेली ४ वाहने नगरपरिषदेकडुन प्रत्येक प्रभागात नेण्यात आली. लहान मोठ्या अश्या तब्बल ९०० गणेश मुर्तीचे संकलन करून नगरपरिषदे मार्फत उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले.

यासाठी नगरपरिषदेचा आरोग्य विभाग, विद्युत विभाग, वाहन विभाग, प्रशासन विभाग, बांधकाम विभाग यांचे चोख नियोजन करण्यात आले होते.
यावर्षी पार पडलेल्या गणेशोत्सवात जामखेड शहरातील सर्व मंडळांनी तसेच नागरिकांनी नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले . सर्व मंडळांनी शांततेत विसर्जन मिरवणूक काढली . मोठ्या उत्साहात गणरायाचे विसर्जन होत आहे . नागरिकांनी शांततामय वातावरणात यंदा गणेशोत्सव साजरा केला .

शहरातील प्रत्येक उत्सव असाच उत्साहवर्धक वातावरणात प्रत्येकाने साजरा करावा. जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करणाऱ्या जामखेड शहरातील सर्व नागरिकांचे तसेच उत्सव काळात कडेकोट पोलीस बंदोबस्त करणाऱ्या जामखेड पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकारी व पोलिस कर्मचारी यांचे बद्दल कृत्यज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here