गणरायाच्या आरतीचा मान महिलांना संघर्ष मित्रमंडळाचा स्तृत्य उपक्रम

0
233

 

जामखेड प्रतिनिधी

          जामखेड न्युज——

थोर समाज सुधारकांनी अनिष्ट रूढी व परंपरांना मुठमाती देण्यासंदर्भात प्रयत्न केले असतानाही आजही काही भुरसटलेल्या प्रथा आणि परंपरा या माणसाच्या जगण्यातील आनंद हिरावून घेण्याचे काम करतात महिलांच्या बाबतीतही अशाच काही परंपरा त्याना समाजात मिळणाऱ्या सन्मानापासुन वंचित ठेवतात, पूजाअर्चा, परंपरांमध्ये कायम पुरुष अग्रणी आणि स्त्री मागे, असे चित्र वर्षानुवर्षे पहायला मिळत असताना, कोर्ट रोड वरील संघर्ष मित्र मंडळाने महिलांच्या हस्ते गणपतीची आरती करून त्यांना सन्मान देण्याची भुमिका घेतल्याने संघर्ष मित्र मंडळाचे कौतुक होत आहे.

शहरातील कोर्ट रोडवरील संघर्ष मित्र मंडळाने विविध सामाजिक उपक्रमाने गणेशोत्सव करण्यात येतो,याही वर्षी मंडळाच्या वतीने महाप्रसाद,महिलासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते,अनुषंगाने मंडळाने आज सकाळीच्या आरतीचा मान महिलांना दिला,सर्व महिलांनी गणेशांची मनोभावे आरती करण्यात आली श्रीच्या आरतीचा मान महिलांना मिळाल्याने या महिलांनी आनंद व्यक्त केला.


यावेळी मीरा तंटक,अमृता लोहकरे,शोभा निमोणकर,आरती राळेभात,रोहिणी दळवी,कीर्ती चिंतामणी, शुकांता डोंगरे,मनीषा काटकर,सुशा डोंगरे,शोभा चिंतामणी निर्मला शिंदे,उषा ढोले,अंजली लोहकरे,मोहनी ओझर्डे,ज्योती लोहकरे,सीमा लोळगे,विद्या कस्तुरे,नलिनी कासार,वैशाली डोंगरे,सुवर्णा डोंगरे,सोनाली काथवटे,माधुरी काथवटे,सुनीता अंदुरे,अंकिता लोहकरे,ज्योती ढोले,,वंदना डोंगरे,सोनाली लोहकरे,कविता जगदाळे,आरती आष्टेकर,श्रेया भंडारी,मालन शिंदे,ज्योती तंटक,ललिता शेटे,स्वाती शेटे,नंदा तंटक,केशर राळेभात,राणी औचरे,भरती भांगे आदींसह जुने कोर्ट परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संघर्ष मित्र मंडळाने या अशा स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याने परिसरातून कौतूक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here