Friday, November 13, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या ३० वाड्या-वस्त्यांवरील २० हजार नागरिकांसाठी रोज ३० टँकर, ५० किलोमीटरवरून पाणीपुरवठा!

जामखेडच्या ३० वाड्या-वस्त्यांवरील २० हजार नागरिकांसाठी रोज ३० टँकर, ५० किलोमीटरवरून पाणीपुरवठा!

0
2
जामखेडच्या ३० वाड्या-वस्त्यांवरील २० हजार नागरिकांसाठी रोज ३० टँकर, ५० किलोमीटरवरून पाणीपुरवठा!

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडच्या ३० वाड्या-वस्त्यांवरील
२० हजार नागरिकांसाठी रोज ३० टँकर, ५० किलोमीटरवरून पाणीपुरवठा!

जामखेड शहरातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन जामखेड नगरपरिषदेच्या मागणीनुसार उपविभागीय अधिकारी, कर्जत यांनी ९ नोव्हेंबर रोजी आदेश काढत शहरातील ३० वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाई घोषित केली आहे. त्यामुळे सुमारे २० हजार नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

या वस्त्यांसाठी दररोज सुमारे ६ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असून, मांदळी येथून ५० किलोमीटर अंतरावरून १५ टँकरद्वारे ३० खेपा करून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या वस्त्यांना मिळणार टँकरचे पाणी : आरोळेवस्ती, कोल्हे मळा, आजबेवस्ती, आयटीआय परिसर, द्रोणागिरी नगर, समतानगर, गुलमोहर नगर, प्रल्हाद कॉलनी, नवीन कोर्ट परिसर, बोराटेवस्ती, बेलेकरवस्ती, जगदाळेवस्ती, बटेवाडी, मोरेवस्ती, राळेभात वस्ती, संताजीनगर,

जिजामाता नगर, विकासनगर, मार्केट यार्ड, धोत्री, लेहनेवाडी, जांबवाडी, शेळकेवस्ती, मानेवस्ती, देशपांडे नगर, कर्जत रोड, अंदुरे पंप परिसर, हिमालय पंप परिसर आणि अहिल्यावस्ती.
आदेशानुसार सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेतच पाणीपुरवठा करणे, पाण्यात जंतुनाशक टाकणे आणि दररोज सायंकाळी ५ वाजता अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. पाऊस झाल्यास टँकर बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

एकीकडे दहिगाव पाणीपुरवठा योजना अतिक्रमणाच्या प्रश्नात अडकलेली असताना दुसरीकडे शहराला ५० किलोमीटरवरून टँकरने पाणी आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जामखेडचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न कधी सुटणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!