गणेशोत्सवानिमित्त रत्नदिप मेडिकल फौंडेशन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये दिशादर्शक संदेश जावा व व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा – डॉ. भास्कर मोरे

0
227

जामखेड प्रतिनिधी

               जामखेड न्युज——

विद्यार्थ्यांमध्ये दिशादर्शक संदेश जावा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते यातुन आजचे विद्यार्थी भविष्यात एक जबाबदार व सुजाण नागरिक म्हणून काम करतात असे डॉ. भास्कर मोरे म्हणाले. 

रत्नदिप मेडिकल फौंडेशन अँण्ड रिसर्च सेंटर जामखेड येथे गणेशोत्सव व शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डाँ. भास्कर मोरे पाटील, डाँ. वर्षा मोरे, डाँ.एस पी सांगळे, डॉ. जितेंद्र कुमार, श्रीम पुजारी डी.पी यांच्यासह विविध मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सवानिमित्त १० दिवस सांस्कृतिक तसेच धार्मिक आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते.

या ठिकाणी आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायण महापूजा निमित्त सुमारे१००० मान्यवर व विद्यार्थी यांना सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष डाँ. भास्कर मोरे म्हणाले, कोणत्याही कार्याची सुरुवात गणेशाच्या पुजनाने केले जाते. शैक्षणिक संस्थान मधील कार्यक्रमाचे आयोजन करताना त्या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यां मध्ये दिशादर्शक संदेश जावा,त्या कार्यक्रमामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा. व सामाजिक संदेश जावा, समाजामध्ये ते एक जबाबदार नागरिक म्हणून काम करण्यासाठी जातील.

त्यावेळी या उपक्रमातून आपल्याला शिकायला जे मिळाल ते प्रेरणादायी मिळाल ते समाज हितासाठी अमलात आणले पाहिज. हिच भावना ठेवून अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here