जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
जामखेड नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक वादग्रस्त निर्णयामुळे गाजत आहे. मतदार यादीवर दोन हजारांपेक्षा जास्त हरकती आलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक सहा व सातसह अनेक प्रभागात मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात आला आहे. नकाशा एक, चर्तु:सिमा एक आहे तेव्हा चर्तु:सिमा दुरूस्त करावी व खाडेनगर रसाळनगर व शांतीनाथ आश्रम हे प्रभाग पुर्वी प्रमाणे सात मध्ये ठेवावेत व 2015 प्रमाणे अंतिम यादी ठेवावी अन्यथा शिवसेना टाईल्सने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
नगरपरिषदेच्या मतदार यादीतील घोळ ताबडतोब दुरुस्त करावा म्हणून शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे यांनी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर शिवसेना अल्पसंख्यांक प्रमुख नासिर खान, शंकर कुचेकर, कृष्णा शिरोळे, करण ढेरे, योगेश शिंदे, विजय ढेरे, सुरेश चावरे यांच्या सह्य़ा आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, काही पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून तसेच आर्थिक गैरव्यवहार करत अधिकारी व कर्मचारी यांनी दबावाखाली मतदार याद्या केल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणावर घोळ आहे. 2015 ला सात मध्ये असणारे नावे त्या लोकांची इच्छा नसतानाही ते सहा मध्ये घुसवले आहेत. रसाळनगर, शांतीनाथ आश्रम हे भाग जर सहा मध्ये जोडले तर सहाची मतदार संख्या तीन हजार व सातची सातशे राहिल हे बरोबर नाही. सध्या याबाबत अनेक मतदारांनी तक्रार नोंदवली तरीही त्यांची दखल घेतली नाही. तेव्हा पुर्वी प्रमाणे 2015 नुसार व्हावी. अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापुर्वी आमच्या हरकती व तक्रार अर्जावर काय निर्णय झाला ते दाखवावे अन्यथा शिवसेनेच्या टाईल्सने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे यांनी दिला आहे.