जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील राजुरी येथील खुप दिवसाचे जुने पिंपळाचे झाड अचानक कोसळले यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असून जामखेडला प्राथमिक उपचार करून नगरला हलवले आहे. तर तिघांना किरकोळ जखम झाली यामुळे जामखेडला उपचार घेत आहेत.

शिर्डी हैदराबाद रस्त्यावर राजुरी गाव आहे. गावात रोडवर बसस्थानकावर दादा लटपटे यांचे चहाचे हाॅटेल आहे. या ठिकाणी जुने पिंपळाचे झाड आहे. सकाळी गावातील लोक चहाच्या हाॅटेल मध्ये चहा घेण्यासाठी व गप्पा मारण्यासाठी बसतात सकाळी साडेसात आठ च्या आसपास अचानक झाड कोसळले यात चार जण गुंतले होते चौघांना ग्रामस्थांनी बाहेर काढले व जामखेडला दवाखान्यात आणले.

यातील परसराम पाटीलबुआ कोल्हे यांच्या मनक्याला मार लागला आहे त्यामुळे जामखेडला उपचार घेऊन नगरला हलवले आहे. तर महादेव नाना लटपटे, विलास बापू कांबळे, असीफ कुरेशी हे तिचे किरकोळ जखमी झाले आहेत. त्याच्यावर जामखेड ला उपचार करण्यात आले.

झाड अचानक पडल्याने एकच गोंधळ उडाला तिथे उपस्थित असणारे सरपंच गणेश कोल्हे, नाना काळदाते, सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे, रामभाऊ राऊत, खेंगरे भाऊसाहेब, काका कोल्हे, संभाजी कोल्हे, साहिल राऊत, निलेश वनवे, भाऊसाहेब काळदाते यांनी मदत केली.





