जामखेड न्युज——
हरियाणा (रोहतक) या ठिकाणी झालेल्या U15 नॅशनल कुस्ती स्पर्धेत मामासाहेब मोहोळ तालमीचा चपळ चित्ता पैलवान सुजय तनपुरे याने 68 KG FS वजन गटामध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदकाची कमाई करून दिली.
पैलवान सुजयने पहिल्या कुस्तीमध्ये पंजाबच्या दिपक सिंग या मल्ला वरती 10-0 असा विजय मिळवला. नंतर उपांत्य फायनल च्या कुस्तीमध्ये उत्तर प्रदेशच्या विकेश यादव यावरती 9-2 सा विजय मिळवून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला, सेमी फायनल मध्ये दिल्लीच्या निशांत रोहील वरती 3-1 असा विजय मिळवला व फायनल मध्ये प्रवेश केला, फायनल कुस्ती मध्ये हरियाणाच्या यश सोबत चिटपटीने विजय मिळवत महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले.
पैलवान सूजय ची थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे वडील नागनात तनपुरे यांचे गावामधे एक छोटे हॉटेल आहे पण त्यांची मुलांना पैलवान करायची इच्छा त्यांनी मोठा मुलगा विकास आणि त्यानंतर सुजय याच्या माध्यमातून पूर्ण झाली,सामान्य घरामधून संजय च प्रवास सुरू झाला गावामधील छोट्याश्या भैरवनाथ तालीम मध्ये वस्ताद विठ्ठल देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू झाला त्याच्यासोबत गावातील आणखीही पैलवान पोर आहेत सर्वांनी खूप जिद्दीने सराव केला,सगळेच पुढं नाही जाऊ शकले पण सुजय आणि सौरभ गाडे, यशवंत गाडे, शुभम लटके यांनी पुणे मध्ये मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल येथे कुस्तीचे धडे घेतले तेथे त्यांना वस्ताद पंकज भाऊ हरपुडे वस्ताद महेश मोहोळ व अमित जाधव वस्ताद यांनी मार्गदर्शन केले आणि आज सुजय ने गोल्ड मेडल मिळवले आहे.
सुजयचे कौतुक पूर्ण गावाला आहे त्याच्या सहकाऱ्यांना यासाठी आहे की कुठेही कुस्ती करताना वीज लकलकावी अश्या पद्धतीने समोरच्या पैलवानाला सुजय चितपट करतो आणि विजयी होतो,सुजय वर सर्व स्थरा मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, माजी सरपंच सोमनाथ तनपुरे, छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर, सरपंच हनुमंत उतेकर, उपसरपंच विठ्ठल देवकाते, सोसायटी चेरमन माऊली कडू यांसह गावातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले