आमदार रोहित पवारांबरोबर कर्जत-जामखेड मधील शेकडो युवक कार्यकर्ते प्रेरणा घेण्यासाठी रायगडावर!!! आमदार रोहित पवारांबरोबर कार्यकर्त्यांनी केली स्वच्छता

0
277

जामखेड प्रतिनिधी

             जामखेड न्युज——

 

“शिवाजी महाराजांनी जे आदर्श घालून दिले त्या आदर्शांना प्रमाण मानून आपण सर्व वाटचाल करू असा संकल्प आज आपण रायगडाच्या या पुण्यभूमीत करू हिंदवी स्वराज्याचा विचार म्हणजे केवळ सत्ता नाही तर प्रजेचे कल्याण, शेतकऱ्यांचे कल्याण, व्यापार वृद्धी, अर्थव्यवस्था, आरमार, परकीय आक्रमकांपासून आपल्या राज्याचे रक्षण आणि राज्याची भरभराट हा तो विचार आहे.तो विचार आपण आत्मसात करू असे विचार आमदार रोहित पवारांनी व्यक्त केले. 
आमदार रोहित पवारांबरोबर  कर्जत-जामखेड तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते प्रेरणा घेण्यासाठी रायगडावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात,
जामखेड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद शिंदे, नरेंद्र जाधव, नाहुलीचे सचिन घुमरे, जाळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे, अरूण गाडेकर, अमर चाऊस, नय्युम शेख, हरीभाऊ आजबे, कांतीलाल वाळुंजकर, गणेश चव्हाण, नितीन धांडे, विश्वदर्शन न्युजचे  गुलाब जांभळे, संभाजी राळेभात, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, बावीचे सरपंच निलेश पवार, काकासाहेब राळेभात, अमोल गिरमे, महेंद्र राळेभात, गणेश वराट, दादासाहेब वराट, गणेश कडभने, अमित जाधव, राजू गोरे, नरसाळे डॉक्टर, महादेव वराट सर, सग्राम कोल्हे, सागर कोल्हे, बापुसाहेब कार्ले यांच्या सह अनेक कार्यकर्ते हजर होते. 
  यावेळी बोलताना आमदार रोहित पवारांनी सांगितले की, कर्जत जामखेड तालुक्यातील जनता म्हणजे आपले एकच कुटुंब आहे. हिंदवी स्वराज्य म्हणजे नक्की काय तर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर अठराव्या शतकात त्यांच्या वारसदारांनी दिल्ली जिंकून अटक ते अटक आणि कुमावत ते कावेरी असे विशाल साम्राज्य निर्माण केले हेच ते हिंदवी स्वराज्य आहे. आज आपण येथे प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. रायगडाच्या कणा कणात व माती मातीत इतिहास दडलेला आहे. 
   आमदार रोहित पवार व शेकडो कार्यकर्त्यांनी रायगडावर स्वच्छता मोहीम ही राबविली या पवित्र स्थळी येऊन आपण प्रेरणा घेत आहोत या ठिकाणचे आपण पावित्र्य राखू स्वच्छता करू आमदार रोहित पवारांनी स्वतः स्वच्छता करण्यास सुरुवात केली आणी काही क्षणात परिसर चकाचक केला. 
   दोन दिवसांपूर्वी बारामती येथे जगातील भव्य दिव्य अशी सर्वात मोठी भजन स्पर्धा झाली. तसेच आपण आज रायगडावर प्रेरणा घेण्यासाठी एकत्र आलो आहोत म्हणजे भक्ती शक्तीचा एकत्र संगम आहे. यावेळी रायगड किल्ला व छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सविस्तर माहिती इतिहास तंज्ञानी दिली. यातील बहुतेक युवक रायगडावर चालत आले होते तसेच चालतच खाली उतरले. 
    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here