जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
विविध विकास कामाबरोबरचआमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सर्वात मोठा भगवा ध्वज खर्डा शिवपट्टन किल्ल्यासमोर जामखेड येथे सर्वात उंच तिरंगा ध्वज, तसेच कर्जत येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आणी आता पुण्या मुंबई च्या तोडीची दहीहंडी अशा कामामुळे कर्जत जामखेडचे नाव देशात अग्रस्थानी राहणार आहे. असे मत आमदार रोहित पवारांनी दहीहंडी उत्सव प्रसंगी व्यक्त केले.
कर्जत जामखेडचे कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत-जामखेडच्या वतीने दि. २२ आॅगस्ट रोजी जामखेड येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी अनेक शिवप्रेरणा दर्या पथक कळंबोली, संकल्प प्रतिष्ठान इंदापूर, जय हनुमान बारामती, शंभूराजे तालीम जामखेड या पथकांनी यशस्वी सलामी देत सहभाग घेतला होता. यात सात स्थर रचत स्पर्धेचे प्रथम बक्षीस १ लाख ११११ रूपयांचे बक्षीस आमदार रोहित पवार व बानू ( इशा केसकर) यांच्या हस्ते देण्यात आले तर इतर संघाला मानपत्र देण्यात आले.
आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून जामखेड मध्ये कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. शहरासाठी१६० कोटी पाणीपुरवठा योजना शहरासाठीबंदिस्त गटार योजना ८०कोटी तसेचउपजिल्हा रूग्णालय पन्नास कोटी याचबरोबर अनेक कामे प्रगती पथावर आहेत.
विकास कामाबरोबरच सर्वात मोठा भगवा ध्वज खर्डा शिवपट्टन किल्ल्यासमोर , जामखेड येथे सर्वात उंच तिरंगा ध्वज, तसेच कर्जत येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आणी आता पुण्या मुंबई च्या तोडीची दहीहंडी अशा कामामुळे कर्जत जामखेडचे नाव देशात अग्रस्थानी राहणार आहे.
या दहीहंडी साठी जय मल्हार फेम बानू बानू या भुमीकेतील लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर यांनी जामखेड करांचा उत्साह वाढविला. आमदार रोहित पवारांसह बानू गाण्यावर ठेवा धरला लोकांनीही नृत्याचा आनंद लुटला.
दहीहंडी साठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
जामखेड शहरातील श्री. नागेश विद्यालय या विद्यालयाच्या प्रांगणात ही स्पर्धा रात्री अकरा वाजेपर्यंत चालू होती.