ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त सुंदर फुलांची सजावट

0
213

जामखेड न्युज——

जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्ताने सुंदर सजावट करण्यात आली होती येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेणारी छान सजावट करण्यात आली होती. नागेश्वराच्या दर्शनाला आलेले भाविक आपल्या मोबाईल मध्ये ही सजावट टिपत होते. तसेच अनेकांनी हा फोटो स्टेट्सला ठेवलेला आहे. 
     पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मातेची दररोज वेगवेगळी सजावट केली जाते याच धर्तीवर श्री नागेश्वराची प्रत्येक श्रावण सोमवारी सजावट करण्यात येत होती. आज चौथा श्रावण सोमवार असल्याने गुलाबाची फुले, कापूस याच्या साहाय्याने आकर्षक सजावट करण्यात आली होती. 
 किरण सोनवणे, दादा म्हेत्रे,  सागर म्हेत्रे,  सागर राळेभात, ओम गुरव प्रत्येक श्रावण सोमवारी वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक फुलांनी सजावट केली तेही स्वखर्चाने श्री नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबा खराडे मिलिंद ब्रह्मे महादेव पानसांडे यांनी सर्व श्रावण सोमवारी आकर्षक सजावट केली होती यामुळे एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. 
    नागेश्वर मंदिराचे काम खुप जुने आहे. आता शेजारी नदीच्या दोन्ही बाजूंनी आमदार रोहित पवारांनी सिमेंट रस्ते बनवले आहेत. यामुळे शहरातील लोकांना जवळचा मार्ग झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून दर सोमवारी भजन परंपरा सुरू आहे सकाळी दहा ते बारा या वेळेत भजन केले जाते आज शेवटच्या चौथ्या सोमवारी येथे मोठ्या उत्साहात भजन सेवा पार पडली यामध्ये ह भ प विजय महाराज बागडे, दादासाहेब महाराज सातपुते, सिताराम राळेभात, बाबा महाराज मुरूमकर, जगन्नाथ धर्माधिकारी, भाऊसाहेब आजबे, शेषेराव मुरूमकर, संतोष बारगजे, आप्पा वाडेकर, दिलीप आजबे हे भजनी मंडळ दर सोमवारी भजन करतात. 
निता खवळे यांच्यावतीने आज दिवसभर येणाऱ्या भक्तांसाठी भोजन दिले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here