भारतीय स्वातंञ्याच्या अमृतमहोत्सवात तेलंगशी शाळेस नानासाहेब जायभाय यांच्या तर्फे ५६हजार रुपयांची मदत

0
231
जामखेड न्युज——
   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त नानासाहेब जायभाय यांनी तेलंगशी जिल्हा परिषद शाळेत ५६ हजार रुपयांची मदत केली आहे यामुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 
     संपूर्ण देशभर भारतीय स्वातंञ्याचा अमृतमहोत्सव मोठ्या आनंदाने व राष्ट्रभक्तीने साजरा होत असताना जामखेड तालुक्यातील  जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी शाळेस 75 व्या स्वातंञ्यदिनी दानशूर भूमीपुञाने तब्बल 51 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.याआधी त्यांनी 5000 रुपयांची रोख स्वरुपात मदत दिली आहे.तब्बल 56 हजार रुपये  मदत देणार्‍या या दानशूराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.  तेलंगशी गावचे उपसरपंच असणारे श्री. नानासाहेब  जायभाय  यांनी शाळेच्या बाला या उपक्रमास ही मदत जाहीर केली आहे.
 बाला या उपक्रमास याआधीही सरपंच कांतीलाल जाधव व ग्रामपंचायत सदस्य भरत ढाळे  यांनी प्रत्येकी 5000रु.अशी 10,000रुपयांची मदत केली आहे.तर भाऊसाहेब जायभाय व हनुसाहेब जायभाय यांनी प्रत्येकी 1000 रु. असा 2000 रुपयांचा लोकसहभाग दिला आहे. 
भारतीय स्वातंञ्याचा 75 वा स्वातंञ्यदिन मोठ्या उत्साहात व विविध कलागुणदर्शन सादर करुन साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वक्तृत्व व विविध कलागुणदर्शनास पालकांनी दाद देत  5000 रु. बक्षीसरुपी लोकसहभाग दिला.या कार्यक्रमास सरपंच कांतीलाल जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत जायभाय,सामाजिक कार्यकर्ते व तेलंगशी शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ करण जायभाय,पोलीस पाटील अर्जुन ढाळे,ग्रामपंचायत सदस्य भरत ढाळे,सतीश काळे,ग्रामसेवक शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक केशव गायकवाड व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
      यावेळी स्वराज्य महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय विविध स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त ऋतुजा ढाळे,वैष्णवी जायभाय,समाधान जायभाय,आरती उघडे, आकांक्षा मुंढे,प्रणव उघडे व अनिश मोरे  या विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन प्रेरणा देण्यात आली व तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.रोहित दादा पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच व Kinder joy चाॅकलेट वाटप करुन स्वातंञ्यदिनाचा आनंद द्विगुणीत केला. ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात खाऊचे वाटप केले.कै.विष्णु वस्ताद काशीद यांच्या स्मरणार्थ श्री.अजय दादा काशीद  यांनी शाळेतील 25 खेळाडू विद्यार्थ्यांना स्पोर्ट टी शर्ट दिले.तेलंगशी ग्रामस्थांनी आ.रोहित दादा पवार व मा.अजय दादा काशीद यांचे भरभरुन कौतुक केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे ग्रेड मुख्याध्यापक श्री.केशव गायकवाड यांनी सूञसंचलन विजयकुमार रेणुके व सुशेन चेंटमपल्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंता गायकवाड  यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष गोरे,लक्ष्मी जायभाय व सर्व शिक्षक बांधवांनी विशेष सहकार्य केले.
    पालकांनी दिलेल्या लोकसहभागाचे व शिक्षक विद्यार्थी यांच्या उपक्रमशिलतेचे  गटविकासअधिकारी प्रकाश पोळ,गटशिक्षणाधीकारी कैलास खैरे,विस्तारअधिकारी सुरेश कुंभार , केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते  यांनी भरभरुन कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here