जामखेड न्युज——
जामखेड शहरासाठी लक्ष्मी चौकात खर्डा रोडवर
असलेली स्मशानभूमी म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे. स्मशानभूमी परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. सगळीकडे गवत व काटेरी झुडपे आहेत. अंत्यविधीसाठी आल्यावर बसण्यासाठी जागाही नाही. संरक्षण भिंत नसल्याने घाणीचे साम्राज्य आहे. अशा आशयाची बातमी दहा दिवसांपूर्वी जामखेड न्युजने प्रसिद्ध केली होती या बातमीची प्रशासनाने दखल घेत स्मशानभूमीची स्वच्छता करत गवत व काटेरी झुडपे काढण्यात आली आहेत परिसरातील नागरिकांनी जामखेड न्यूजचे आभार मानले आहेत.
जामखेड शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विंचरणा नदीकाठी तपनेश्वरला स्मशानभूमी आहे. पण विठ्ठल मंदिर, गडी, मुंजाबा गल्ली, महादेव गल्ली नागेश्वर मंदिर परिसर, गोरक्षनाथ नगर भागातील लोकांना तपनेश्वर स्मशानभूमी खुपच लांब अंतर आहे. जवळ लक्ष्मी चौकात खर्डा रोडवर स्मशानभूमी आहे. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य आहे. लोकांना बसण्यासाठी जागा नाही. सगळीकडे गवत व काटेरी झुडपे वाढलेली आहेत. घाणीचे साम्राज्य आहे. जवळ पाण्याची सुविधा नाही. या बातमीची दखल घेत प्रशासनाने दखल घेत स्वच्छता केली आहे.
सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी भव्य दिव्य सिमेंट रस्ता झालेला आहे.
जवळच नगरपरिषद कार्यालय, अभ्यासिका, नाना नाणी पार्क होत आहे. आणी या ठिकाणी आमदार रोहित पवारांनी भव्य दिव्य असा सर्वात मोठा शंभर फुट उंच तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे त्यामुळे या ठिकाणी चांगली स्मशानभूमी लवकरात लवकर बांधण्यात येईल असे आमदार रोहित पवारांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
सध्या जामखेड साठी दोन आमदार आहेत. आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे भाजपाचे सरकार असेल तर शिंदे सरांच्या मर्जीतील सरकार असेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असेल तर रोहित पवार जास्तीत जास्त निधी आणतील त्यांमुळे कोणतेही सरकार असले तरी जामखेड मधील विकास कामे सुरूच राहतील स्मशानभूमी विकास आराखडा तयार करून संरक्षक भिंत व काँक्रीटीकरण अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांनी जामखेड न्युजशी बोलताना केली होती हि बातमी प्रसिद्ध होताच संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्टेडियम सारख्या स्मशानभूमी आहेत. कडेने संरक्षक भिंत तसेच बसण्यासाठी पायऱ्या आत काँक्रीटीकरण आहे. झाडे आहेत तशाच स्वरूपाची अद्ययावत स्मशानभूमी जामखेड साठी आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी जामखेड न्युजकडे केली आहे.