जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज—–

नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेले जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक मोहन पवार व उद्योजक उमेश माळवदकर यांच्या उपस्थितीत जामखेड नगरपरिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बटेवाडी येथे रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेची पावसाने गळत असलेली वर्गखोली व शाळा परिसरात कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबत उपाययोजना करण्यासंबंधी नगरपरिषदेस संपर्क करून प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.

यावेळी नगरसेवक मोहन पवार, उद्योजक उमेश माळवदकर शिक्षक वृंद सीमा निकम मॅडम, शिल्पा साखरे मॅडम , कावळे मॅडम, विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.

यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.