जामखेड न्युज——
बेसा घोगली रोडवर स्कूल व्हॅन नाल्यात पडल्याची घटना
आज (दि. ८) सकाळच्या सुमारास घडली. या व्हॅनमध्ये १८ शाळकरी विद्यार्थी होते व सुदैवाने सर्व बचावले. तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पोद्दार स्कूलच्या
विद्यार्थ्यांना घेऊन व्हॅन चालली होती. नाल्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटले व व्हॅन सरळ शेजारील नाल्यात पडली.घटनास्थळावर बऱ्यापैकी रहदारी होती व लोकांनी सर्व मुलांना बाहेर काढले. तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

घटनेनंतर पोलिसांचे पथकदेखील पोहोचले. व्हॅनमध्ये
क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी होते, तसेच चालक भरधाव वेगाने व्हॅन चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शाळेला व पालकांनादेखील लगेच माहिती देण्यात आली. नागपुरात अर्ध्याहुन अधिक स्कूल व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी नेण्यात येतात.
चौकट
अनेक रिक्षा मध्येही प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक सर्रास सुरू असते विद्यार्थी दाटीवाटीने बसवले जातात दप्तर कडेला पटकावले जाते यामुळे अनेक वेळा अपघात होतात.