पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाचा जामखेड मिडिया क्लबचा स्तुत्य उपक्रम -वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके जामखेड तालुका मिडिया क्लब व वनविभाग यांच्या वतीने शिऊर येथे वृक्षारोपण

0
309

जामखेड न्युज——

   पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण हा अत्यंत चांगला  उपक्रम जामखेड मिडिया क्लबने हाती घेतला आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल मिडिया क्लबचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे मत वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी व्यक्त केले
   नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या जामखेड तालुका मिडिया क्लब व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील शिऊर येथील वाघजाई च्या डोंगरावर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेळके बोलत होते. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, सरपंच हनुमंत उतेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, अरूण लटके, वनपाल प्रविण उबाळे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत, उपाध्यक्ष अशोक वीर, सचिव सत्तार शेख, सहसचिव पप्पूभाई सय्यद, प्रसिद्धी प्रमुख धनराज पवार, अविनाश बोधले, किरण रेडे, अजय अवसरे, वनकर्मचारी श्यामराव डोंगरे, शहाजी नेहरकर, शिवाजी चिलगर, भाऊसाहेब भोगल, राघु सुरवसे, शरद सुर्यवंशी, हरिश्चंद्र माळशिकारे, संजय अडसूळ, बबन महारनवर, नमीत कोठारी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
      यावेळी बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके म्हणाले की, सध्या निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे वृक्षारोपण तर अनेक जण करतात परंतु संवर्धन होणे आवश्यक आहे. मिडिया क्लबने वृक्षारोपणासाठी चांगली जागा निवडली या ठिकाणी वनविभाग या झाडांचे संवर्धन करणार आहे. 
 
    यावेळी बोलताना मिडिया क्लबचे उपाध्यक्ष अशोक वीर म्हणाले की. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संत तुकाराम महाराजांनी वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. 
  मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट म्हणाले की, सुरुवातीपासूनच झाडांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन इत्यादी गोष्टी दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीवर आज जे काही आहे ते सर्व झाडांमुळेच अस्तित्वात आहे.
मनुष्याला जीवनावश्यक वस्तू जसे अन्न, हवा, पाणी, दवा औषधी या झाडांकडूनच मिळतात. म्हणून म्हटले जाते की झाडे लावा झाडे जगवा. छत्रपती शिवाजी महाराजांना ३५० वर्षापूर्वीच झाडांचे महत्त्व समजले होते. वृक्षतोड करणाऱ्यांना योग्य शिक्षा केली जात होती. आपणास कोरोना काळात आक्सीजनचे महत्त्व समजले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही आक्सीजन मिळत नव्हता. आपणास एक झाड करोडो रूपयांचा आक्सीजन देते. पण हे फुकट मिळते म्हणून महत्त्व लक्षात येत नाही. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here