जामखेड न्युज——
जामखेड येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या काका गृपच्या वतीने बसरवाडी शिऊर येथे १०१ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या रोपांच्या संगोपनाची जबाबदारी बसरवाडी शाळेने उचलली पर्यावरण रक्षणासाठी एक आदर्श उपक्रम राबविल्याबद्दल काका गृप व बसरवाडी शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपण सर्वजण…झाडे लावूया… प्रदुषण मुक्त भारत बनवुया..!! हर घर तिरंगा अभियानातंर्गत १०१ रोपांचे वृक्षारोपन बसरवाडी (शिऊर)येथे हर घर तिरंगा अभियानातंर्गत १०१ रोपांचे वृक्षारोपन करण्यात आले.त्याचे संगोपन पालकत्व जि.प.प्राथ.शाळेचे मुख्या.एकनाथ चव्हाण ,सहकारी शिक्षक तात्या घुमरे व शाळेतील ४१ विद्यार्थानी घेतले.रोपासाठी सौजन्य:-१०० रू.एक रोप या प्रमाणे १०० रोपांचे 10000/- (दहा हजार रू.)हि सर्व रक्कम काका गृपच्या वतीने शिऊर गावचे मा.सरपंच सोमनाथ तनपूरे यांच्या हस्ते दिली.

दानशूरता,निसर्गाबाबत असलेले प्रेम,फक्त बोलणेच नाही तर प्रत्यक्ष कृती करून सरांनी भावना व्यक्त केली.सरांचे, त्यांच्या राजमुद्रा अॅटो पुणे,हॉटेल राजमुद्रा पुणे,हॉटेल मैथिली जामखेड खूप खूप आभार खूप खूप अभिनंदन त्यांचे काका प्रतिष्ठान जामखेडचे सर्व मित्रमंडळी,पत्रकार वसंत(काका)राळेभात, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रा.सुनिल नरके ,प्रा.सुनिल पुराणे ,प्रा.अविनाश फलके, सावरगाव शाळेचे मुख्याध्यापक भगवान समुद्र, बाळासाहेब लटके,राजू गाडे,शिऊरचे सरपंच हनुमान उतेकर,उपसरपंच विठ्ठल देवकाते,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पिंपरे,ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र निकम,शाळा व्य.समिती अध्यक्ष मारूती निकम,सोसाटीचे संचालक आत्माराम फाळके,भास्कर तनपूरे,मारूती गाडे,अनिल तनपूरे,कृष्णा समुद्र,अंबादास निकम,गौतम निकम,उत्तम पिंपरे,सदाशिव निकम,लक्ष्मण निकम,बापू फाळके,श्रीराम मुटके,पाचबैल,दादा समुद्र,शहाजी पिंपरे,बाळू पिंपरे,सिद्धेश्वर रोडगे,किसन रोडगे,बापू सुर्वे,तुकाराम निकम,ज्ञानेश्वर निकम,माऊली फाळके, हरिभाऊ कडू,अशोक निकम,नरसिंग पिंपरे,बिभीषण पिंपरे,विश्वभर सुर्वे,बाबु निकम,महादेव सुर्वे,मुटके,अशोक सुळसकर महिला वर्ग,समस्त ग्रामस्त बसरवाडी उपस्थित होते.

प्रथम गावातून वाजत गाजत वृक्षदिंडी काढण्यात आली.खड्डे घेतलेल्या ठिकाणी रोपे ठेवण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.सर्वांनी वृक्षसंवरर्धनाची प्रतिज्ञा घेतली. झाडासाठी खड्डे खोदणे, माती लावणे, झाडाला आधाराला काठी लावणे या सर्व गोष्टी ग्रामस्त,विद्यार्थी मोठया आनंदाने करत होते.हर घर में तिरंगा,तिरंगा ध्वज घेवून देशभक्तीपर गित गायन घेण्यात आले.प्रत्येकाची छाती गर्वाने,देशाभिनाने फुलुन आली.एक वेगळेच वातावरण बसरवाडीत निर्माण झाले.निसर्गाला फक्त ओरबडायचेच नाही तर आपण ही खूप काही देणे लागतो.निसर्गाचे देणेकरी या भूमिकेतून घेतलेला हा वैशिष्टयपूर्ण उपक्रम होता.