जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील रहिवासी संपुर्ण तालुका व जिल्ह्यात एक धाडसी, कणखर व संघर्षशिल नेतृत्त्व माजी जि. प. सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तेलंगशीचे माजी सरपंच सुभाष (आप्पा) जायभाय वय ५८यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

आत्ताच याबाबत खात्रीशीर वृत्त हाती आले आहे.
कै. सुभाष जायभाय यांचा राजकीय व सिताराम महाराज उंडेगावकर यांचे निधनानंतर त्यांची समाधी खर्डा कि बाबांच्या मुळगावी व्हावी यावर झालेले संघर्ष सुभाष आप्पांचे चाहते व परिचीत कधीही विसरणार नाहीत.

आप्पांच्या निधनाने जामखेड तालुक्यात निर्माण होणारी राजकीय पोकळी न भरून निघणारी आहे. जामखेड तालुक्यातील सर्व स्तरातून आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
जामखेड येथील हगामा कार्यक्रमात ते शेवटची कुस्ती होईपर्यंत हजर होते काल त्यांना नगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. नगर येथेच दवाखान्यात निधन झाले आहे.