जामखेड न्युज——
शहरातील अनेक ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य पसरले आहे या दुर्गंधीचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक ठिकाणी शौचालयाची सोय नसल्यामुळे अनेक ठिकाणी लोक उघड्यावर लघवीला जातात यामुळे परिसरातील महिला व मुलींची मोठ्या प्रमाणावर कुचंबना होते. नगरपरिषदेने शहरात जागोजागी शौचालयाची उभारणी करावी तसेच दुर्गंधी होणार नाही यांची दक्षता घ्यावी अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.

बसस्थानक परिसर, खर्डा रोड परिसर मार्केट यार्ड परिसर या भागात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे तसेच अनेक लोक उघड्यावर लघवीला जातात यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणावर कुचंबना होते. तसेच घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरात तर महिलांसाठी शौचालयाचा मोठ्या प्रमाणावर आभाव आहे. शनिवारी बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर महिला येतात पण शौचालयाची सोय नसल्याने महिलांची मोठ्या प्रमाणावर कुचंबना होते. नगरपरिषद प्रशासनाने ताबडतोब जागोजागी शौचालयाची उभारणी करावी तसेच शहरात कोठेही घाण होणार नाही यांची काळजी घ्यावी. तसेच बस स्थानक परिसर खर्डा रोड जवळील मेन रोडच्या कडेला, मार्केट यार्ड परिसर भागात अनेक लोक उघड्यावर लघवीला जातात यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी परिसरातील नागरिकांनी जामखेड न्युजशी बोलताना केली आहे.
शहरात स्वच्छता अभियानासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो तो कोठे खर्चि टाकला जातो नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होत नसतील तर कर भरून काय फायदा असा प्रश्न निर्माण झाला आहे.