जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
विद्यार्थ्यांना शिस्त, आभ्यासात सातत्य व परिसर स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करून विद्यालयात प्रगतीपथावर नेऊ तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व गुरूकुल यावर विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करण्यासाठी पुर्ण वेळ शाळेसाठी देणार असे नवनियुक्त प्राचार्य बी. के मडके यांनी सांगितले.

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयाच्या प्राचार्य पदी मडके बी. के. यांनी पदभार स्वीकारला बद्दल नागेश विद्यालय स्कूल कमिटी व कन्या विद्यालय स्कूल कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, विठ्ठल अण्णा राऊत, कन्या विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य प्रा मधुकर आबा राळेभात, सुरेश भोसले, उद्योजक दिलीप बाफना, मुख्याध्यापिका चौधरी के.डी, पर्यवेक्षक हरिभाऊ ढवळे, दत्तात्रय ढाळे, संतोष ससाने रमेश बोलभट, प्रा प्रकाश तांबे, दिलीप ढवळे एनसीसी ऑफिसर मयूर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व स्कूल कमिटीच्या सदस्यांनी सत्कार करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचलन संतोष ससाणे आभार मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी यांनी केले.