जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
येथील ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव यांचा श्री संत. ज्ञानेश्वर सेवा संस्थान व महादेव मंदिर देवस्थान भवरवाडी तालुका जामखेडच्या संस्थापक भागवताचार्य ह.भ.प. कांताबाई महाराज सोनटक्के यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा श्री ज्ञानेश्वर महाराज सेवाधाम माळी बाभूळगाव चे संस्थापक ह.भ.प. अनिल महाराज वाळके, अतुल महाराज आदमाने, प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
ॲड. डॉ. अरुण जाधव हे ग्रामीण विकास केंद्र जामखेड संचालित निवारा बालगृहाच्या माध्यमातून समाजातील अनाथ, निराधार, गोरगरीब, वंचित, ऊसतोडणी कामगार, वीट भट्टी कामगार व लोककलावंतांच्या मुलांचा सांभाळ करतात. व त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या ५ वर्षांपासून काम करीत आहेत. सध्या निवारा बालगृहात ६५ मुला-मुलींचे वास्तव्य आहे. त्यांच्या या कार्याबद्दल ह.भ.प. कांताबाई सोनटक्के यांनी हा सत्कार केला.
ह.भ.प. कांताबाई सोनटक्के यांनी श्री संत ज्ञानेश्वर सेवा संस्थान व महादेव मंदिर देवस्थान भवरवाडी च्यावतीने होणार असणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताह तसेच श्री संत ज्ञानेश्वर वारकरी संस्कार केंद्राबाबत सविस्तर माहिती दिली.