Tuesday, March 10, 2026
Home ताज्या बातम्या दगडी कोळशाचा ट्रक पलटी, एक जण जखमी जामखेड पासून जवळच सौताडा...

दगडी कोळशाचा ट्रक पलटी, एक जण जखमी जामखेड पासून जवळच सौताडा रस्त्यावरील घटना

0
8

जामखेड न्युज—–

दगडी कोळशाचा ट्रक पलटी, एक जण जखमी

जामखेड पासून जवळच सौताडा रस्त्यावरील घटना

जामखेड पासून जवळच जामखेड सौताडा रस्त्यावर दगडी कोळशाचा ट्रक पलटी झाला यामध्ये एक जण जखमी झाला आहे. ट्रक व कोळसा रस्त्यावर पडल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन येताच स्वतः ची अँब्युलन्स घटनास्थळी दाखल केली आणि अपघातातील जखमींना मदत केली.

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर मोहा फाटा येथील रोडवरच दगडी कोळशाचा ट्रक पलटी झाल्याचे श्रीकांत रेडे याने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन केला कोठारी यांनी ताबडतोब आपली रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली पलटी झाल्याने मोटरसायकल वरील गोपीनाथ विठोबा पठाडे वय ५५ राहणार हरिनारायण आष्टा तालुका आष्टी जिल्हा बीड जखमी झाला आहेत.

सदरची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिले असून त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी पाठवण्याची व्यवस्था त्यांनी केली.

दगडी कोळशाचा ट्रक क्रमांक १२ पीक्यू ७७९५ आणि मोटरसायकल क्रमांक एम एच २३ व्हि ३६९७ सदर अपघाता कामे दीपक भोरे आणि ऋषिकेश शेळके यांनी मदत केली.

बराच वेळ रोडवर दगडी कोळसा पडल्याने रहदारीस अडथळा झाला होता शेवटी क्रेन आणि जेसीबी रस्त्यावरील गाडी बाजूला घेऊन कोळसा बाजूला सरकून रहदारी चालू केली आहेत.

जामखेड येथील पोलिसांनी त्वरीत मदत केली असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!