जामखेड न्युज——
श्री संत सावता महाराज समाधी सोहळा निमित्त जामखेड येथील विठ्ठल मंदिरात दि. २१ ते २८ जुलै दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह दिंडी सोहळा करून सुरू करण्यात आला या अखंड हरिनाम सप्ताहात अनेक नामवंत किर्तनकार, प्रवचनकार सहभाग घेत आहे. दैनंदिन हरीपाठ, प्रार्थना, भजन, हरीकिर्तन यामुळे वातावरण भक्तीमय झाले आहे. दि. २८ रोजी काल्याचे किर्तनानंतर महाप्रसाद वाटप होवून सप्ताहाची सांगता होणार आहे.
जामखेड शहरातील श्री संत सावता महाराज सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह दि. २१ पासून विठ्ठल मंदिरात सुरू झाला. या सप्ताहात हभप संभाजी महाराज कोकाटे, हभप मंजतकर महाराज, हभप राजेंद्र झेंडे, हभप राजेंद्र किंबहुणे यांनी प्रवचनसेवा तर किर्तनसेवा हभप. आजीनाथ महाराज पफाळ, हभप बाळासाहेब रंजाळे, हभप निवृत्ती बोडखे, हभप विजय बागडे यांनी सेवा दिली आहे.
सोमवारी हभप वैजीनाथ महाराज खोटे यांचे प्रवचन व हभप रोहीदास महाराज शास्त्री (किर्तन) यांचे किर्तन,
मंगळवारी हभप बाबा महाराज ढवळे यांचे प्रवचन व हभप मनोहर महाराज इनामदार यांचे किर्तन, बुधवारी हभप ईश्वर महाराज तऊर यांचे प्रवचन व हभप नामदेव महाराज विधाते यांचे किर्तन होणार आहे.
गुरुवार दि. २८ रोजी हभप नामदेव शास्त्री विधाते यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर नगरसेवक ज्ञानेश्वर झेंडे यांचा महाप्रसाद होणार आहे.
या सप्ताहात श्री विठ्ठल भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, वामनभाऊ मठ, यांची साथ असून काकडा भजन, गाथा भजन व हरीपाठ नेतृत्व हभप महादेव महाराज रासकर करीत आहेत. या संपूर्ण सप्ताहात मारूती म्हेत्रे, सिताराम उबाळे, बंडू म्हेत्रे, हरीभाऊ बेलेकर, बळीराम म्हेत्रे, दत्तात्रय अवसरे, बंडू हराळे, आजीनाथ बोराटे, दत्तू जावळे, मारुती झगडे श्रीधर खेत्रे, संजय बेलेकर, हभप महादेव महाराज रासकर, संत नामदेव महाराज पुण्यतिथी महाप्रसाद यांनी अन्नदान केले आहे.
श्री संत सावता महाराज समाधी सोहळ्यात चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे विठ्ठल मंदिर व परीसरात भक्तीमय वातावरण झाले आहे. सांगता समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत सावता महाराज सेवा मंडळाने केला आहे.