भारतीय मजदूर संघ स्थापना दिन जामखेड महावितरण कार्यालयात उत्साहात साजरा

0
285

जामखेड न्युज——

 

२३ जुलै हा भारतीय मजदूर संघ स्थापना दिन भारतातील विविध उद्योग क्षेत्रातील भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या कामगार संघटनांचे सभासद मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिनाचे औचित्य साधून येथील महाराष्ट्र राज्याच्या वीज क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या “महाराष्ट्र वीज कामगार महासंघ” जामखेडच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

 

 

शनिवार दि. २३ रोजी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात “विश्वकर्माच्या ” प्रतिमेचे पुजन महावितरण उपकार्यकारी अभियंता जयंत कासलीवाल व सहाय्यक अभियंता विजय गावित यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कामगारांना संबोधित करताना भारतीय मजदूर संघ अहमदनगरचे सहसचिव अविनाश ओतारी यांनी भारतीय मजदूर संघ स्थापना, उद्देश व कार्य या बाबतीत विस्ताराने उल्लेख केला.
भारतीय मजदूर संघाचे अहमदनगर येथील विषेश निमंत्रित आदीनाथ पठाडे म्हणाले, मजदूर संघ हा कामगार क्षेत्रात भारतामध्ये अग्रस्थानी आहे आणि याचे श्रेय संपुर्ण कामगार वर्गाला आहे. आपली संघटना ही फक्त संघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कार्य करत नसुन असंघटित क्षेत्रातील अत्यंत तळागाळातील शोषित, पिडीत, वंचित घरेलु कामगार, बांधकाम, रोजंदारी, कंत्राटी, बाह्यस्रोत कामगारांचे संघटन करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते.

 

मजदूर संघ हा फक्त कामगारांच्याच हितासाठी झटत असतो असे नव्हे तर उद्योग हित व राष्ट्र हिताला ही प्राधान्य देणारे संघटन आहे. कामगार हित, उद्योग हित व राष्ट्र हित आपली त्रिसुत्री आहे. “देश के हित मे करेंगे काम, कामका लेंगे पुरा दाम” हे आपले घोषवाक्य आहे. त्याग, तपस्या और बलिदान हा आपला नारा आहे. आपली संघटना ही उद्योग हिताला प्राधान्य देणारे संघटन असल्यामुळे आपल्यावर सोपवलेली जबाबदारी ही उद्योग हिताबरोबरच लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण आपण जनसेवक,जनमित्र आहोत असा उल्लेख केला.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय अध्यक्ष भरत नाईकनवरे, संघटनेचे सभासद गणेश सातपुते, श्रीकांत गडदे, सदाशिव थोरात, शंकर डाडर, बाबासाहेब पुराणे, फाळके, संतोष अष्टेकर विजय कापसे आदि सभासदांचे सहकार्य लाभले. शेवटी पतसंस्थेचे संचालक चंद्रशेखर वैद्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here