जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
तालुक्यातील रत्नापूर येथे घरातील लोक घराला कुलूप लावून शेतात गेले आसता अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करुन १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ग्रामीण भागात वेळोवेळी भरदिवसा घरफोड्या होत आसल्याने चोरटय़ांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी होत आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यातीलफिर्यादी मिना बाळासाहेब वारे, रा रत्नापूर यांच्या फर्शीवस्ती यांच्या राहत्या घरी दि १९ रोजी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. यानंतर काही तासांनी त्यांचा एक मुलगा जामखेड या ठिकाणी कामासाठी तर दुसरा मुलगा घराला कुलूप लावून शेतात कामानिमित्त गेला होता. याच संधीचा फायदा अज्ञात चोरटय़ांनी घेतला. दि १९ रोजी दुपारी १ ते ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी फिर्यादीच्या बंद घराच्या कुलुप कशाच्या तरी सहाय्याने तोडुन घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले रोख ८० हजार व काही सोने आसा एकुण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फीर्यादीचा शेतात गेलेला मुलगा घरी आला त्यावेळी त्याला घराचे दार उघडे दिसले त्याने घरात जाऊन पाहिले आसता चोरी झाल्याचे लक्षात आले. गेल्या दोन तीन महिन्यांपासून जामखेड तालुक्यात भरदिवसा घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच साकत येथिल कडभनवाडी येथेही साकेश्वर महाराजांचा मुकुट चोरीला गेला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा रत्नापूर या ठिकाणी घरफोडी झाली आसल्याने लवकरात लवकर या चोरटय़ांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी केली आहे. रत्नापूर चोरी प्रकरणी फीर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अनिलराव भारती हे करत आहेत. घटनास्थळी फींगर प्रिंट व श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते.