Google Map वर औरंगाबादचे नाव संभाजीनगर

0
200
जामखेड न्युज——
औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतराचा वाद राज्यात चांगलाच तापला असताना एक मोठा बदल झाला आहे. गुगल मॅपवर औरंगाबादचं नाव बदललं आहे. गुगलवर औरंगाबाद शहर असं टाईप केल्यानंतर तिथे औरंगाबादच्या बरोबर खाली संभाजीनगर असं लिहून येत आहे. 
गुगल मॅपवर औरंगाबादचं बदलेलं नाव संभाजीनगर अपडेट झालं आहे. गेल्या आठवड्यापासून नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला होता. महाविकास आघाडी सरकारने अल्पमतात असताना औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. 
हा निर्णय भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचं सरकार आल्यानंतर ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.  
केवळ गुगल मॅपच नाही तर गुगलवरील औरंगाबादचंही नाव बदलण्यात आलं असून संभाजीनगर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता गुगल मॅपवर संभाजीनगर असा उल्लेख आल्याने पुन्हा वादाला तोंड फुटणार का? यावरून राजकीय वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय भूमिका असणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
सरकार अल्पमतात असताना नामांतराचा निर्णय घेणं योग्य नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं होतं.  तर आता महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेलं नाव गुगल मॅपवर आल्याने नवा राजकीय वाद निर्माण होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here