जामखेड न्युज——
सततच्या पावसामुळे गावात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता याचा त्रास शाळकरी मुले व ग्रामस्थांना सहन करावा लागत होता नीट चालता येत नव्हते. ही अडचण ओळखून गावातील सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे यांनी पदरमोड करून गावात चाळीस ट्रॅक्टर मुरुम टाकला यामुळे ग्रामस्थ व शाळकरी मुलांची चिखलापासून सुटका झाली आहे. ग्रामस्थ व शाळकरी मुलांनी सागर कोल्हे यांचे आभार मानले आहेत.

मागील आठवड्यातच त्यांचा वाढदिवस होता यानिमित्त त्यांनी राजुरी, सतेवाडी, डोळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त पुस्तके दिली तसेच गावातील अंधाराचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी पंचवीस एलईडी लॅम्प बसविले यामुळे गाव प्रकाशमान झाले.

आता ग्रामस्थ व शाळकरी मुलांना चिखल तुडवत रस्त्याने ये जा करावी लागत होती ती अडचण ओळखून चाळीस ट्रॅक्टर मुरूम टाकल्यामुळे चिखल व दलदली पासून ग्रामस्थ व शाळकरी मुलांची सुटका झाली आहे. सर्वानी सागर कोल्हे यांचे आभार मानले आहेत
गेल्या 10 दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे राजुरी मध्ये बऱ्याच ठिकाणी चिखल झाला होता, स्टँडवरती शाळेतील मुलांना उभं रहायला सुद्धा जागा नव्हती , ही गोष्ट सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ कोल्हे यांच्या राजुरी मधील बऱ्याच ग्रामस्थांनी लक्षात आणून दिली ,त्या ठिकाणी युवा नेते सागर भाऊ कोल्हे यांनी स्वखर्चाने 40 ट्रॅक्टर मुरूम टाकून दिला आहे त्यांच्या या सामाजिक कार्याच कराव तेवढं कौतुक कमीच आहे धन्यवाद सागर दादा
ग्रामस्थ राजुरी