एका महिन्यापुर्वी जामखेड शहरात मोबाईल चोरीची घटना जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झाली होती यानुसार तपासाची चक्रे फिरवत जामखेड पोलीसांनी मोबाईल चोराला जेरबंद केले आहे.
दिनांक १४/०६/२०२२ रोजी रात्री. ११/०० वा ते पहाटे ०३/०० वा दरम्यान जामखड येथील मिलींदनगर
या ठिकाणी फिर्यादी नामे किर्ती गणेश बेदरे यांचे घरात अज्ञात चोरटयाने अनाधिकाराने प्रवेश करुन त्यांचा १४०००/- रु कि.चे सॅमसंग व रिअलमी कंपणीचे दोन मोबाईल हॅन्डसेट घर फोडी चोरी करुन नेलेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस ठाणे गु.र.न २५९/२०२२ भादवि क ४५७,३८० अन्वये
गुन्हा रजि. दाखल करण्यात येवुन त्याचा तपास पोहवा/एस डी लोखंडे यांचेकडे दिला होता.
पोहवा/एस डी लोखंडे यांनी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु
करुन चोरीस गेलेल्या मोबाईल चा शोध घेणेकरीता मा. पोलीस अधिक्षक कार्यालयातील मोबाईल सेल
विभागास पत्रव्यवहार करुन सदर मोबाईलचे लोकेशन, वापरत असलेल्या क्रमांकाचे कॉल डिटेल प्राप्त करुन
यातील आरोपी निष्पण्ण करुन झालेल्या तपासात आरोपी सुरज शिवा शिंदे वय २० वर्षे रा मिलींद नगर
जामखेड ता जामखेड याचा शोध घेवून त्यास दिनांक १४/०७/२०२२ रोजी अटक करुन त्याचेकडुन गुन्हयातील
चोरी केलेले अंदाजे १४,०००/-रुकि.चे दोन्ही मोबाईल हस्तगत करुन ताब्यात घेण्यात आले आहेत. सदर
बाबत जामखेड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी मा. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली
पोउपनि. राजु थोरात, पोहवा/१०३ लोखंडे, पोना/साठे, पोना/कुरेशी, पोशि/बेल्हेकर, यांनी मोबाईल सेल चे रिंकु
माढेकर यांच्या मदतिने उत्कृष्टरीत्या तपास केला आहे.